औंढा नागनाथ,दि 17 (प्रतिनिधी)ः
औंढा नागनाथ पोलीस स्टेशन औंढा येथे दाखल असलेल्या फसवणुकीच्या पुण्यातील दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
पोलीस स्टेशन औंढा नागनाथ येथे गुन्हा दाखल असलेल्या आरोपी रवी उर्फ साहेबराव मोतीराम टोम्पे राहणार शेळगाव गौरी तालुका नायगाव जिल्हा नांदेड हा गेल्या दोन वर्षापासून फरार होता सदर फरार आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यासाठी पोलीस अध्यक्ष हिंगोली यांनी विशेष पथक स्थापन करून अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक श्रीधर वाघमारे पोअ ज्ञानेश्वर सावळे पो,अ, अमोल चव्हाण यांचे पथक तयार करण्यात आले होते या पथकाने फरार आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेत औंढा पोलीस ठाण्यात हजर करून अटक केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक वाघमारे करीत आहेत.
Shabdraj www.shabdraj.com