17/10/26
Breaking News

हिंगोलीत दसरा महोत्सव स्पर्धेत महसूल क्रिकेट संघ विजयी

हिंगोली,दि 17
संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर सार्वजनिक दसरा महोत्सव समिती व पत्रकार क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आज सकाळी महसूल क्रिकेट संघ विरुद्ध पत्रकार क्रिकेट संघ यांच्यात रंगतदार सामना खेळविण्यात आला. या सामन्यात महसूल क्रिकेट संघाने पत्रकार क्रिकेट संघावर मात करत विजय संपादन केला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि पत्रकार विकास सोसायटीचे अध्यक्ष कल्याण देशमुख यांची उपस्थिती होती.
महसूल क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना ८९ धावांची मजल मारली. विजयासाठी मैदानात उतरलेल्या पत्रकार क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, महसूल क्रिकेट संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर पत्रकार क्रिकेट संघाला विजय मिळवता आला नाही. अखेर महसूल क्रिकेट संघाने हा सामना जिंकला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पत्रकार क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंनी सहकार्य केले.
१८ ऑक्टोबर रोजी रंगणार क्रिकेटचे सामने
स्पर्धेतील पुढील सामने १८ ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे ‌ क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
पहिला सामना — क्वार्टर फायनल पत्रकार क्रिकेट संघ विरुद्ध महसूल क्रिकेट संघ
दुसरा सामना — सेमीफायनल शिक्षक क्रिकेट संघ विरुद्ध व्यापारी क्रिकेट संघ
तिसरा सामना कोरोना वॉरियर्स संघ

Check Also

 फरार आरोपीला औंढा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औंढा नागनाथ,दि 17 (प्रतिनिधी)ः औंढा नागनाथ पोलीस स्टेशन औंढा येथे दाखल असलेल्या फसवणुकीच्या पुण्यातील दोन …