.शब्दराज मीडिया परभणी दि०९ परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे महायुतीच्या सर्व नगरसेवकांची सदिच्छा भेट घेऊन विविध विकासकामे, स्थानिक प्रश्न तसेच आगामी नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा केली. महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान हे उमेदवार आहेत. सईद खान यांच्या उमेदवारीमुळे सक्षम आणि विकासाभमुख नेतृत्व दोन्ही जिल्ह्याला लाभणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पाथरी मतदारसंघात …
Read More »महाराष्ट्र
मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी, अमृत मानस मित्रचे मोफत प्रशिक्षण
परभणी, दि. 9 – आजच्या वेगाने बदलणाऱ्या शैक्षणिक आणि सामाजिक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक ताणतणाव, भावनिक समस्या, वर्तनात्मक अडचणी, सोशल मीडिया व डिजिटल व्यसन, करिअरविषयक संभ्रम, तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित विविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. आणि त्यामुळे अनेक गंभीर घटना आणि समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित समुपदेशकांची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही गरज …
Read More »सन 1961 पासूनचे महसुली अभिलेख आता एका क्लिकवर; डिजिटल सातबारा पोर्टलवर ई-रेकॉर्ड्स सुविधा उपलब्ध
परभणी, दि. 9 : नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद, पारदर्शक व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी तहसील कार्यालय, परभणी यांच्या वतीने महसूल विभागातील सन 1961 पासूनचे जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सातबारा उतारे, फेरफार नोंदी, शेतपुस्तके, पाहणी पत्रके तसेच इतर महत्त्वपूर्ण महसुली दस्तावेजांचे स्कॅनिंग, डिजिटायझेशन आणि संगणकीकरण करण्यात आले …
Read More »कर्जमाफीसह अनेक महत्वाचे निर्णय,मंत्रिमंडळ बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (9 जून) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफी मिळणार आहे. यासाठी जवळपास 14 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. 2017 आणि 2019 च्या कर्जमाफीत अनेक शेतकरी अडकले होते. 2017 आणि 2019 …
Read More »गंगाखेड नगरपरिषदेत नोकरभरती व भूखंड घोटाळ्याचा गंभीर आरोप
गंगाखेड प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा गंगाखेड नगरपरिषदेत मागील काळात झालेल्या नोकरभरती व भूखंड व्यवहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार, नियमबाह्य भरती व सत्तेचा गैरवापर झाल्याचे गंभीर आरोप करत संबंधित प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय (ED) व केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मार्फत चौकशी करावी, अशी जोरदार मागणी कॉ ओंकार पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी, परभणी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले …
Read More »सेलू उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न
सेलू ( प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्यातील रक्ताचा वाढता तुटवडा लक्षात घेऊन, उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे आज दिनांक ०९ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे स्वतः रक्तदान करत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट …
Read More »हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदाच खुबा सांधे बदलाची शस्त्रक्रिया
हिंगोली,दि 09 हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 29 वर्षीय मुलावर खुबा सांधेप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली, जिल्ह्याच्या वैद्यकीय इतिहासात पहिल्यांदाच ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे, हिंगोलीत वर्षभरापासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत आहेत, एरवी नांदेडला रेफर होणारे रुग्ण आता शासकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील यशस्वीरित्या पार पडत …
Read More »विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा : खासदार संजय जाधव यांचे कुलगुरूंना पत्र
परभणी, दि. ८ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील प्रकल्पग्रस्तांच्या भरती प्रक्रियेला होणारा विलंब लक्षात घेता खासदार संजय जाधव,आमदार डॉ.राहुल पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी कुलगुरूंना पत्र देत भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात कुलगुरूंना दिलेल्या पत्रात खासदार जाधव,आमदार डॉ.राहुल पाटील यांनी नमूद केले की, विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रिया जुलै २०२५ पासून सुरू असून वारंवार मुदतवाढ दिली …
Read More »शिवसेना नेते सईद खान यांच्या पुराव्यामुळे मंदिर विकासासाठी मोठा निधी विकासाभिमुख नेतृत्वाची चर्चा
परभणी,दि 08 ः शिवसेना नेते आणि महायुतीचे विधानपरिषदेचे उमेदवार सईद खान यांनी पाथरी मतदारसंघातील विविध धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने त्यांच्याकडे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. कोणताही भेदभाव न करता मंदिरांच्या विकासासाठी सर्वाधिक निधी आणण्याचे काम त्यांनी केल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. सईद खान यांनी सतत मुख्यमंत्री आणि उपमुख्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्याने पाथरी येथील …
Read More »पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचा प्रशासनाला पडला विसर -ग्रामस्थांनी दिले निवेदन
गंगाखेड,दि 08 ः बनपिंपळा (ता. गंगाखेड) येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, याबाबत गटविकास अधिकारी गंगाखेड यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, दि. ३१ मे २०२६ रोजी येणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असूनही ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडून कोणताही अधिकृत कार्यक्रम, अभिवादन अथवा उपक्रम …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com