23/06/26
Breaking News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीसाठी अँग्रीस्टँक नोंदणी अनिवार्य – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली, दि. 23 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील एकूण 908 थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, त्यासाठी 3 कोटी 67 लाख 77 हजार 214 इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील 181 शेतक-यांनी अँग्रीस्टँक नोंदणी अद्याप केलेली नाही, अशा शेतक-यांनी कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी अनिवार्य असलेली नोंदणी तात्काळ करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
जिल्ह्यातील अँग्रीस्टँक नोंदणी नसणा-या थकित शेतक-यांची तालुकानिहाय हिंगोली 56, औंढा नागनाथ 32, सेनगाव 23, कळमनुरी 43 आणि वसमत 27 अशा एकूण 181 शेतक-यांनी अँग्रीस्टँक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तालुकानिहाय लाभार्थी शेतकरी व मंजूर रक्कम पुढीलप्रमाणे आहे. हिंगोली तालुक्यातील 227 शेतकऱ्यांना 81 लक्ष 69 हजार 188 लाख रुपये, सेनगाव तालुक्यातील 170 शेतकऱ्यांना 72 लक्ष 44 हजार 785 लाख रुपये, वसमत तालुक्यातील 222 शेतकऱ्यांना 1 कोटी 5 लाख 40 हजार 950 रुपये, कळमनुरी तालुक्यातील 103 शेतकऱ्यांना 37 लक्ष 51 हजार 538 रुपये तर औंढा नागनाथ तालुक्यातील 186 शेतकऱ्यांना 7 लक्ष 70 हजार 753 रुपये असा एकूण 908 थकबाकीदारी शेतक-यांना 3 कोटी 67 लक्ष 77 हजार 214 रुपये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
सदर थकीत कर्जखात्यांच्या तपासणीचे काम सहा शासकीय लेखापरीक्षकांमार्फत पूर्ण करण्यात आले असून संबंधित खाती राज्य शासनाच्या एफएलआरएस पोर्टलवर परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत अपलोड करण्यात आली आहेत.
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी जिल्ह्यातील 181 पात्र शेतकऱ्यांनी ‘अँग्रीस्टॅक’ नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अद्याप अँग्रीस्टॅक नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी ती तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
या योजनेमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीस मदत होणार आहे. तसेच अँग्रीस्टॅक नोंदणीमुळे शेतकऱ्यांना भविष्यातील विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्रीमती सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.

Check Also

सेलूमध्ये महेश नवमीनिमित्त आरोग्य शिबिराला ३२१ नागरिकांचा प्रतिसाद

सेलू ( प्रतिनिधी ) माहेश्वरी समाजाचा पवित्र सण ‘महेश नवमी’चे औचित्य साधून सेलू तालुका माहेश्वरी …