23/06/26
Breaking News

 जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष  गजाननराव घुगे यांचा उमेदवारी अर्ज

हिंगोली,दि 23 (प्रतिनिधी)ः
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार गजाननराव घुगे यांनी आपले उमेदवारी अर्ज परभणी येथे दाखल केले.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार गजाननराव घुगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, सहकाराची समृद्ध परंपरा जपत जिल्ह्यातील शेतकरी, बँक सभासद आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपण कटिबद्ध आहोत. बँकेच्या माध्यमातून तळागाळातील घटकांचा आर्थिक विकास साधणे आणि पारदर्शक कारभाराद्वारे सहकार क्षेत्र अधिक बळकट करणे हाच आमचा मुख्य संकल्प आहे.

Check Also

सेलूमध्ये महेश नवमीनिमित्त आरोग्य शिबिराला ३२१ नागरिकांचा प्रतिसाद

सेलू ( प्रतिनिधी ) माहेश्वरी समाजाचा पवित्र सण ‘महेश नवमी’चे औचित्य साधून सेलू तालुका माहेश्वरी …