10/08/26
Breaking News

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23 
हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी डिग्रस येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रयत्न केले.
आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या कामासाठी 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
डिग्रस फाटा दाटेगाव रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून या रस्त्यावरील पुलाचे काम सुद्धा सुरू आहे.विशेष म्हणजे डिग्रस फाटा ते दाटेगाव या रस्त्यावरून संत गजानन महाराज शेगाव पालखी याच रस्त्यावरून पंढरपूरला जात असते.विशेष म्हणजे डिग्रस फाटा ते दाटेगाव या रस्त्यावरून जवळपास १०ते १२ खेडे गावचे ग्रामस्थ शेतकरी शाळकरी मुलं याच रस्त्यावरून जिल्ह्याच्या ठिकाणी ये जा करतात.या रस्त्याचे काम व पुलाचे काम चांगल्या प्रकारे सुरू झाल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

गंगाखेडात ‘सेफ फूड’ अभियान कागदावरच; अन्न प्रशासनाचा ‘कानाडोळा’?

रामप्रसाद ओझा | गंगाखेड प्रतिनिधी गंगाखेड : नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या अन्नसुरक्षेच्या प्रश्नाकडे अन्न …