18/07/26
Breaking News

सन 1961 पासूनचे महसुली अभिलेख आता एका क्लिकवर; डिजिटल सातबारा पोर्टलवर ई-रेकॉर्ड्स सुविधा उपलब्ध

परभणी, दि. 9  : नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद, पारदर्शक व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी तहसील कार्यालय, परभणी यांच्या वतीने महसूल विभागातील सन 1961 पासूनचे जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत सातबारा उतारे, फेरफार नोंदी, शेतपुस्तके, पाहणी पत्रके तसेच इतर महत्त्वपूर्ण महसुली दस्तावेजांचे स्कॅनिंग, डिजिटायझेशन आणि संगणकीकरण करण्यात आले असून हे अभिलेख आता डिजिटल सातबारा पोर्टलवरील ई-रेकॉर्ड्स सुविधेद्वारे नागरिकांना उपलब्ध झाले आहेत.

e-Records मधून कागदपत्रे मिळविण्याची प्रक्रिया-
टप्पा 1: लॉगिन प्रक्रिया – https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dsir या संकेतस्थळाला भेट या. OTP Based Login या पर्यायावर क्लिक करा. Enter Mobile Number मध्ये आपला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा. Send OTP वर क्लिक करा. मोबाईलवर प्राप्त झालेला OTP Enter OTP या रकान्यात प्रविष्ट करा. Verify OTP वर क्लिक करा. OTP पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आपण यशस्वीरित्या लॉगिन व्हाल.

टप्पा 2: e-Records पर्याय निवडा -लॉगिन झाल्यानंतर e-Records या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर जुनी कागदपत्रे शोधण्यासाठी डॅशबोर्ड उपलब्ध होईल.

टप्पा 3: आवश्यक माहिती भरा – टॅशबोर्डवर खालील माहिती निवडा: कार्यालय – जिल्हा

टप्पा 4: दस्तावेज निवडा – तालुका – गाव – दस्तावेज – उपलब्ध दस्तावेजांमधून आवश्यक कागदपत्र निवडा : – फेरफार टिप्पण गुणाकार पुस्तक सातबारा आकारफोड पत्रक काप आकारबंद कन्सॉलिडेशन – आकारबंद दशमान कन्सॉलिडेशन स्कीम कन्सॉलिडेशन जवाब- शेतपुस्तक- खासरा पाहणी पत्रक शेतपुस्तक पुरवणी – जुने पाहणी पत्रक

टप्पा 5 : कागदपत्र शोधा – खालीलपैकी योग्य पर्याय निवडून माहिती भरा : – गट क्रमांक – हिस्सा क्रमांक सर्वे क्रमांक जुना सर्वे क्रमांक -त्यानंतर Search बटणावर क्लिक करा.

टप्पा 6 : कागदपत्र पाहणे व डाउनलोड करणे -शोध पूर्ण झाल्यानंतर पुढील पर्याय दिसतील : – View Document, – Download Document – कागदपत्र डाउनलोड करण्यासाठी Download Document या पर्यायावर क्लिक करा.

टप्पा 7 : शुल्क भरणे – – प्रत्येक कागदपत्र डाउनलोड करण्यासाठी ₹30/- शुल्क आकारले जाते. – शुल्क भरण्यासाठी Recharge Account या पर्यायाद्वारे खाते रिचार्ज करावे. – रिचार्ज पूर्ण झाल्यानंतर संबंधित कागदपत्राची डिजिटल स्वाक्षरीयुक्त (Digitally Signed) प्रत डाउनलोड करता येईल.

या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ, श्रम व खर्चाची बचत होणार असून महसुली अभिलेख मिळविण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम झाली आहे. सर्व नागरिकांनी या ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परभणी तहसीलदार डॉ. संदिप राजपुरे यांनी केले आहे.

Check Also

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड

जिंतुर,दि 17 पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची …