18/07/26
Breaking News

सेलू उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न

सेलू ( प्रतिनिधी )
परभणी जिल्ह्यातील रक्ताचा वाढता तुटवडा लक्षात घेऊन, उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे आज दिनांक ०९ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे स्वतः रक्तदान करत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट परभणी जिल्ह्यामध्ये झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढणे हे होते. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व इतर नागरिकांसह एकूण ५१ लाभार्थ्यांनीरक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या कार्यक्रमाला डॉ. असोसिएशन सेलूचे अध्यक्ष डॉ. ऋतुराज साडेगावकर सर, माननीय गटविकास अधिकारी श्री. उदय जाधव सर यांनीही रक्तदान केले.परभणीचे माननीय आर.एम.ओ. डॉ. कल्याण कदम सर यांनी कार्यक्रमास भेट दिली.मेट्रन श्रीमती पंडित मॅडम , इन्चार्ज श्री विकास चव्हाण आणि श्री. काटकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय परभणी येथील रुग्णालयातील तांत्रिक व वैद्यकीय स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागेश लखमावार व जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ राठोड मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. विनायक आंबेगावे, पी.आर.ओ. श्री. आत्माराम जटाळे, रक्त वैज्ञानिक अधिकारी श्री. आसाराम गीते, रक्त वैज्ञानिक अधिकारी श्री. प्रतीक भराडे, मो. एजाज, रक्त वैज्ञानिक अधिकारी श्री. रामा डेंगळे, श्री. मारुती सिरगंजवार, श्री. शुभम अंभोरे आणि श्री. नाना मरकड यांनी विशेष परिश्रम घेतले.
या शिबिरामध्ये खालील शिबिर यशस्वी करण्यासाठी खालील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. *डॉ. संजय हरबडे सर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय,
डॉ. अमोल राठोड , श्री पवन फरकांडे, राम डेंगळे , श्री अभिषेक देशमुख, श्री इंद्रजीत मगर, श्री गणेश पडूळ, डॉ. नयन धरणे, फयाज शेख, श्री निलेश कवडी, श्री प्रकाश खरात, श्री प्रवीण नाईकनवरे, सय्यद समीर, श्रीमती शानेट शजी, डॉ.गौरी साबू
श्रीमती शारदा राणी पंडित , श्रीकांत कलागडे, विशाल काकडे, श्री आत्माराम साळवे,
श्रीमती साधना दळे , श्रीराम पवार, श्री आनंद शिंदे, श्री आर डी मगर श्री बिडी खिलारे, श्री सचिन गायकवाड, श्री चेतन फोपसे, अंजली लोखंडे, डॉक्टर गणेश मुळे, जयश्री चव्हाण, श्री भाग्यश्री राठोड, श्रीमती सविता दुमाने, दीक्षा खाडे, श्री योगेश बीडला , श्री विलास गव्हाणे, श्री रामेश्वर गरड, डॉ. हबीब अली श्री सतीश कांबळे ,श्री सुनील राऊत, आकाश वीर गोविंद चहे, श्री.राधाकिसन मगर, श्री जीवन भदरगे,दीपक सिगारे , अभिजीत पांजगे , इंद्रजीत मगर इत्यादी अधिकारी कर्मचारी यांनी शिबिरामध्ये सहभाग नोंदविला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून उपजिल्हा रुग्णालयाच्या या पवित्र मोहिमेला खंबीर सहकार्य केले. स्वतःहून पुढे आलेल्या सर्व जीवनदूतांचे व रक्तदात्यांचे रुग्णालय प्रशासनातर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत…..

Check Also

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड

जिंतुर,दि 17 पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची …