17/07/26
Breaking News

हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदाच खुबा सांधे बदलाची शस्त्रक्रिया

हिंगोली,दि 09 
हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 29 वर्षीय मुलावर खुबा सांधेप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली, जिल्ह्याच्या वैद्यकीय इतिहासात पहिल्यांदाच ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे, हिंगोलीत वर्षभरापासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत आहेत, एरवी नांदेडला रेफर होणारे रुग्ण आता शासकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील यशस्वीरित्या पार पडत आहेत, आज जिल्ह्यातील एका 29 वर्षीय तरुणावर खुबा सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली आहे अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिली असून या तरुणाच्या शस्त्रक्रियेसाठी अस्थिव्यागोपचार शास्त्र विभागातील विभाग प्रमुख डॉ विलास मुसळे आणि त्यांच्या टीम कडून ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, या शस्त्रक्रिया दरम्यान
भुलतज्ज्ञ डॉ सर्फराज, डॉ पुरोहित, शस्त्रक्रिया विभागातील परिचारिका अधिपरिचारिका आदींनी सहकार्य केले तर या रुग्णालयाचे अधिष्ठदाता डॉ श्रीचक्रधर मुंगल सर उप अधिषटातi हणमंते, डॉ मनुरकर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ दीपक मोरे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे, जिल्ह्यातील रुग्णांनी विविध शस्त्रक्रियासाठी जिल्हा हिंगोलीच्या शासकीय महाविद्यालयात भरती व्हावे असे आवाहन यावेळी रुग्णालय प्रशासनाने केले आहे

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …