18/07/26
Breaking News

सईद खान यांनी घेतली सेनगाव येथे महायुतीच्या नगरसेवकांची भेट

.शब्दराज मीडिया
परभणी दि०९
परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे महायुतीच्या सर्व नगरसेवकांची सदिच्छा भेट घेऊन विविध विकासकामे, स्थानिक प्रश्न तसेच आगामी नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा केली.

महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान हे उमेदवार आहेत. सईद खान यांच्या उमेदवारीमुळे सक्षम आणि विकासाभमुख नेतृत्व दोन्ही जिल्ह्याला लाभणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पाथरी मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकास कामामुळे सईद खान चर्चेत आले आहेत.
विधान परिषदेची रणधुमाळी सुरू झाली असून सईद खान यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यांना मोठ्या प्रतिसाद लाभत आहे. शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीचे सर्वच कार्यकर्ते, मतदार असलेली नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.
मंगळवारी सईद खान यांनी सेनगाव येथे भेट दिली. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी महायुतीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर सविस्तर विचारविनिमय झाला. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
लोकहित आणि विकास हेच सर्वोच्च ध्येय ठेवून पुढील वाटचाल अधिक प्रभावीपणे करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Check Also

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड

जिंतुर,दि 17 पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची …