परभणी,दि 08 ः
शिवसेना नेते आणि महायुतीचे विधानपरिषदेचे उमेदवार सईद खान यांनी पाथरी मतदारसंघातील विविध धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने त्यांच्याकडे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. कोणताही भेदभाव न करता मंदिरांच्या विकासासाठी सर्वाधिक निधी आणण्याचे काम त्यांनी केल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
सईद खान यांनी सतत मुख्यमंत्री आणि उपमुख्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्याने पाथरी येथील साई जन्मस्थान पाथरी च्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल ९१ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक विकासालाही गती मिळणार आहे.तसेच, रामपुरी रत्नेश्वर देवस्थान येथील विविध विकासकामांसाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये सभागृह, महिलांसाठी चेंजिंग रूम, रस्ते आदी विकासकामांचा समावेश आहे.
पाथरी शहरातील राम मंदिर विकासासाठी ५० लाख रुपये खर्चून मंदिराचे अर्धवट काम पूर्ण करण्यात आले. तसेच, एकता नगर परिसरातील देवस्थानासाठी ५० लाख रुपयांच्या खर्चातून संरक्षक भिंतीचे काम करण्यात आले आहे.
यशवाडी येथील प्रसिद्ध मारुती मंदिर परिसरातील रस्त्याच्या कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून काम पूर्ण करण्यात आले. याशिवाय, पाथरी तालुक्यातील मुदगल मंदिर विकासासाठी देखील १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत.या विविध विकासकामांमुळे पाथरी मतदारसंघातील धार्मिक स्थळांना नवे स्वरूप प्राप्त होत असून, स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
Shabdraj www.shabdraj.com