17/10/26
Breaking News

राणी सावरगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

गंगाखेड (प्रतिनिधी) –
जिल्हा परिषद परभणीचे राणी सावरगाव गटाचे सदस्य सय्यद अल्ताफ यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी गुंजेगाव पॉईंट येथील पांडुरंग फंक्शन हॉलमध्ये आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरात एकूण २९२ व्यक्तींनी नेत्र तपासणी करून घेतली. त्यापैकी ६१ व्यक्तींची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून ५१ जणांना औषधोपचार देण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य भगवानराव जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य सय्यद अल्ताफ, पंचायत समिती प्रतिनिधी सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते.यावेळी आदर्श शिक्षक नारायणराव जाधव, बालाजी लटपटे, मारोतीआप्पा कोरे, राजेश्वर स्वामी, रमेश कुलकर्णी, अरुणआप्पा मंगलगे, सोपानराव उर्फ पप्पू जाधव, राम नरवाड, सय्यद समीर, उपसरपंच सदानंद जाधव, बाळासाहेब भिमनपल्लेवार, तुकाराम हाके, गजू ठाकूर, निलेश जाधव, सायन्स हाके, कोंडीबा हाके, विठ्ठल घाडे, आकाश हाके, प्रल्हाद हाके, शाम कवडे, खुशाल फुगणार, गजानन करले, बंडू पुजारी, शेख नफीस, मुखीद कुरेशी, कलीम शेख, बाबासाहेब साळवे, विठ्ठल निलेवाड, ज्ञानेश्वर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुण्यांचा सत्कार हार-तुरे न करता पुस्तक भेट देऊन करण्यात आला. दुष्काळाची परिस्थिती पाहता वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाधव यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवशंकर डोईजड यांनी  केले.

अध्यक्षीय समारोपात भगवानराव जाधव म्हणाले, सय्यद अल्ताफ यांनी वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड देत गरजू रुग्णांसाठी हा आदर्श उपक्रम राबविला आहे. या शिबिरासाठी शंकर शेठ साबळे सोलापूर, डॉ. विशाल कुकडे यांनी कार्यभाग सांभाळला तर अरुण वाघमारे यांचे सहकार्य लाभले.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …