16/10/26
Breaking News

मोदक, खवा अन् प्रसादावर एफडीएची धाड

 गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्नपदार्थ मिळावेत यासाठी राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या धडक कारवाईदरम्यान नियमबाह्य कारभार करणाऱ्या अनेक प्रसिद्ध हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दुकानांवर कडक कारवाई करण्यात आली असून, राज्यभरातून लाखो रुपयांचा भेसळयुक्त साठा आणि बंदी असलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे.
एफडीएच्या पथकाने राज्यभरात कारवाई करत 30 लिटर दूध तसेच 413.7 किलो दुग्धजन्य पदार्थ व मिठाईचा साठा जप्त केला आहे. या जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत 15 लाख 58 हजार 72 रुपये इतकी आहे. 11 ते 14 सप्टेंबरदरम्यान 38 खाद्य आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली. यात दूध, खवा, तूप, मिठाई यांसारख्या 47 खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

प्रसिद्ध हॉटेल्स आणि डेअरींचे परवाने निलंबित

अन्न सुरक्षेचे आणि स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या मुंबई आणि पुणे विभागातील अनेक नामांकित आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कुलाबा येथील प्रसिद्ध ‘कॅफे मोंडेगर’चा परवाना निलंबित करण्यात आला आहे. एफडीएच्या तपासणीत या कॅफेमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेत गंभीर त्रुटी आढळल्या. येथे गरम पदार्थ 60 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानावर न ठेवणे, कोल्ड स्टोरेजमध्ये 5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान न राखणे, ड्रेनेजची अपुरी व्यवस्था आणि उपकरणांची स्वच्छता नसणे या बाबी समोर आल्या.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …