गंगाखेड /प्रतिनिधी
येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कला शाखेतील गुणवंत विद्यार्थिनी कु.श्रावंती श्रीराम चव्हाण यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांनी नुकतीच पीएच.डी.पदवी प्रदान केली आहे.श्रावंती चव्हाण यांनी तत्त्वज्ञान विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मानवतावादी तत्त्वज्ञान एक चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन करून विद्यापीठाकडे शोधप्रबंध सादर केला होता.विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा प्लेग्रिझम अहवाल शून्य टक्के आला असून त्यांच्या संशोधन कार्याची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.हा संशोधन प्रबंध त्यांनी शारदा महाविद्यालय परभणी येथील तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ.स्वाती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला.
पीएच.डी.प्रदान प्रक्रियेदरम्यान बाह्य परीक्षक म्हणून अहिल्यानगर येथील प्रा.डॉ.अमन बगाडे उपस्थित होते.तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विभागाचे समन्वयक डॉ.प्रमोद लोणारकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांना पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली.श्रावंती चव्हाण या श्री संत जनाबाई महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांनी पदवी शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन करत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कला शाखेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता.त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे गंगाखेड परिसरासह महाविद्यालयाचे नावही गौरवले गेले आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल उपप्राचार्य डॉ.संतोष गायकवाड,गजानन राठोड,श्रीराम चव्हाण,बेबी चव्हाण,डॉ.सचिन खोकले,डॉ.रोहित गायकवाड,संदीप डहाळे,श्रीकांत चव्हाण आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Shabdraj www.shabdraj.com