16/06/26
Breaking News

सईद खान यांच्या विजयासाठी  महायुती एकवटली,आजी- माजी लोकप्रतिनिधींचा भक्कम पाठींबा

परभणी,ता 14
परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक रंगतदार असून तिरंगी लढतीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयासाठी संपूर्ण महायुती एकवटली असल्याचे चित्र सध्यातरी निर्माण झाली आहे.

परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना अल्पसंख्या विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना उमेदवारी देण्यात आली.महायुतीचे पारडे भक्कम झाल्याचे चित्र आहे. महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संपूर्ण भाजपाची टीम कामाला लावली आहे. या निवडणुकीत महायुतीचे सर्वाधिक मतदार आहेत. जिंतूर नगरपालिकेवर भाजपाची सत्ता आहे, सोनपेठ येथे जनसुराज्य पक्ष,पूर्णा गंगाखेड येथे यशवंत सेनेचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. जनसुराज्य आणि यशवंत सेना हे सुरुवातीपासूनच भाजपच्या गोटात आहेत. मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड येथे देखील महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ आहे. वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे तर हिंगोली आणि कळमनुरी या नगरपालिकेवर शिवसेना शिंदे गटाची सत्ता आहे.सेनगाव नगरपंचायतमध्ये शिंदेसेनेचे संख्याबळ आहे. एकूणच महायुतीकडे संख्याबळ असून तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी परभणीच्या मतदारसंघाकडे विशेष लक्ष देत तिन्ही पक्षातील आपसातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सईद खान यांच्यासाठी ही बाब दिलासादयक ठरली आहे.
….
महायुतीतील सर्व आमदारांचा मिळवला पाठिंबा
सईद खान यांनी आमदार  राजेश विटेकर यांचे मन वळविण्यात यश मिळाले आहे पक्षाने दिलेला आदेश आपण पाळणार आणि  खान यांना विजयी करणार असे  विटेकरांनी जाहीर केले. विटा येथे झालेल्या धोंडे जेवण कार्यक्रमांमध्ये दोघांनी गळाभेट देखील घेतली तर वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी देखील सईद खान यांच्यासाठी प्रचार बैठक घेतली एकूणच दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सईद खान यांच्या पाठीशी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर,खासदार रामराव वडकुते,आमदार संतोष बांगर,आमदार तान्हाजी मुटकुळे,आमदार रत्नाकर गुट्टे,आमदार राजेश विटेकर,आमदार राजु नवघरे,आमदार हेमंत पाटील यांच्या सह  शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादीचे माजी आमदार देखील सईद खान यांच्या विजयासाठी परिश्रम घेत आहेत.

 

Check Also

 ‘वनामकृवि’ व ‘मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्र’ यांच्यात सामंजस्य करार!

हिंगोली: मराठवाडा व राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि हळद प्रक्रियेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक …