17/07/26
Breaking News

महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा विजय निश्चीत,आ.राजु नवघरे यांच्या उपस्थित राष्ट्रवादीने केला विजयाचा निर्धार

हिंगोली, दि. 13 :
परभणी–हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना उमेदवार सईद खान यांच्या पाठीशी हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार वसमत येथे झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, कन्हैया बाहेती, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार राजू नवघरे यांनी बोलताना सांगितले की, सईद खान यांनी कोणतेही पद नसताना पाथरी मतदारसंघात उल्लेखनीय विकासकामे केली आहेत. ते जनतेशी थेट संपर्क असणारे आणि आरोग्य दूत म्हणून हजारो रुग्णांना मदत करणारे नेते आहेत. मंदिरांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी आणला असून असा तळमळीचा नेता विधिमंडळात असणे आवश्यक आहे, म्हणूनच संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हिंगोली, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत येथील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महायुतीतील नगरसेवक सईद खान यांच्या पाठीशी ठाम असून त्यांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …