जिंतूर/ प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्याच्या पर्यावरणविषयक जनजागृती मोहिमेला प्रतिसाद देत जिंतुर शहर मंडळाच्या वतीने येथील क्रीडा संकुल परिसरात १०१ वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. मा. ना. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचे केलेले आवाहन लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. वाढते प्रदूषण, बदलते हवामान …
Read More »मराठवाडा
पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या लातूर व हिंगोलीमध्ये धाडी
हिंगोली,दि 05 ः नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी लातूर व हिंगोली जिल्हयात पोलीस पथकाची रवानगी केली होती.या पथकाने लातूर जिल्हयातील अहमदपुरात मटका अड्डयांवर छापे टाकले आहेत, तर हिंगोलीतील औंढा नागनाथ वाळू घाटावर कारवाई, 1 कोटी 25 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर पथकाने दि.3 रोजी रोजी, लातूर जिल्हयातील अहमदपुरात भाजी मार्केट …
Read More »हिंगोलीत पर्यावरण दिनानिमित्त भाजपाने केले वृक्षारोपण
हिंगोली(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि मोदी सरकारच्या कार्यकाळाला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, जून महिन्यात हिंगोली शहरात विविध सामाजिक व रचनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सर्वप्रथम मागील वर्षी लावेल्या झाडांचे सौ.जिजाबाई मुटकुळे यांनी पुजन केले यानंतर वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात खासदार रामराव वडकुते,आमदार तान्हाजीराव मुटकुळे,जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे,विभागीय वन अधिकारी पुष्पा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,माजी …
Read More »खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी माणिक लोडे तर उपसभापतीपदी निखिल बांगर यांची बिनविरोध निवड
हिंगोली(प्रतिनिधी) येथील खरेदी विक्री संघाच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक आज अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये सभापती पदी भारतीय जनता पार्टीचे माणिक लोडे तर उपसभापती पदी निखिल बांगर यांची सर्व संचालकांनी एकमताने निवड केली आहे. या निवडीनंतर भाजपा आणि मित्र पक्षाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. खरेदी विक्री संघाच्या नवनिर्वाचित संचालकांची विशेष …
Read More »महिलांनी अन्याय अत्याचाराविरुद्ध पुढे येऊन तक्रार देण्याची गरज-प्रेमलता जगताप
हिंगोली,ता 05 (बातमीदार)ः महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत मात्र अनेक वेळा महिला तक्रार देण्यासाठी धजावत नाहीत. मात्र आता महिलांनी अन्याय अत्याचाराविरुद्ध पुढे येऊन तक्रार देण्याची गरज असल्याचे मत हिंगोलीच्या दामिनी पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप यांनी शुक्रवारी तारीख ५ केसापूर येथे व्यक्त केले. हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे पोलिस अधीक्षक निलाभव रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जनजागृती कार्यक्रमात त्या …
Read More »अनधिकृत बॅनर होणार कारवाई, महापालिका प्रशासनाच्या कठोर सूचना
परभणी,दि 03 ः परभणी शहरातील अनधिकृत बॅनर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत आयुक्त नितीन नार्वेकर आणि उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी महानगरपालिका प्रशासनास आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार परभणी महानगरपालिका अंतर्गत सर्व सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती अ, ब, क, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सी.एस.आय. व एस.आय. यांना शहरातील राजकीय, धार्मिक तसेच व्यावसायिक स्वरूपाचे विनापरवानगी लावण्यात आलेले अनधिकृत …
Read More »परभणीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई,किसान बेकरीसह….
परभणी, दि. ३- नागरिकांना सुरक्षित व भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यांत दोन ठिकाणी कारवाई करून लेबल दोष असलेले बेकरी पदार्थ व खुले खादयतेल यांचा एकूण रुपये ३ लाख ४७ हजार ४४० किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार …
Read More »जनगणना २०२६–२७ : प्रगणकांवर मुदतीपूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्याचा दबाव
गंगाखेड प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा जनगणना २०२६–२७ अंतर्गत शहर व शहरालगतच्या भागातील घरे, गोदामे, शेतआखाडे व आस्थापनांची गणना करण्याची अंतिम मुदत १४ जून असताना, गंगाखेड तहसील कार्यालयाकडून ही प्रक्रिया ४–५ जूनपर्यंतच पूर्ण करण्यासाठी प्रगणक व सहाय्यकांवर दबाव टाकण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या मुदतीपूर्व सक्तीमुळे प्रगणक, सहाय्यक व पर्यवेक्षकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, नियोजनशून्य कामवाटप व असमान जबाबदाऱ्यांमुळे …
Read More »नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात धडक मोहीम
नांदेड, दि. 3 जून: नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलिस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशीच 13 लाख 84 हजार 721 रुपयांचा गुटखा व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान गुटख्याची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले …
Read More »चौकशी फक्त मुख्याधिकाऱ्यांपुरतीच का?गंगाखेड नगर पालीका भरती प्रकरण
दै. शब्दराज / रामप्रसाद ओझा, गंगाखेड गंगाखेड नगरपरिषदेमधील बेकायदेशीर कर्मचारी भरती व कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्यावरच चौकशीची प्रक्रिया केंद्रित होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात फक्त मुख्याधिकाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारला जात असताना, त्या काळातील प्रशासक, वरिष्ठ अधिकारी व संबंधित विभागप्रमुख चौकशीच्या बाहेर कसे राहिले? असा थेट सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com