06/08/26
Breaking News

पालम येथे 06 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

परभणी, दि. 30 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी व माधवराव पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पालम आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित), नाशिक, शाखा पालम यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 06 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या कालावधीत पालम येथील माधवराव पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील विविध नामांकित उद्योग, कंपन्या व खासगी आस्थापनांचा सहभाग राहणार आहे.

 

Check Also

परभणी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची माहिती…

परभणी / प्रतिनिधी – परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य रायझिंग मेन पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम अखेर …