राज्यातील ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांच्या आत आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे. कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे काहीही कारण नाही. ती उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडूनच वर्ग केली जाणार आहे. कर्जमाफी प्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज वाटप करणे शक्य होणार असल्याचेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, कृषी विभागाकडून सर्वच शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारने जे कर्जमाफी केली त्यामध्ये 16 लाख 96 हजार खात्याची यादी आपल्याकडे लागली आहे. जिल्हा बँकेत काही अडचण वाटत नसली तरी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. शेतकरी जेव्हा तिथे ई केवायसी करायला जातो त्यावेळी त्याच्यावर असलेले कर्ज आणि व्याज आणि रक्कम यामध्ये तफावत दिसते.
Shabdraj www.shabdraj.com