24/07/26
Breaking News

देशाच्या राजधानीत पत्रकारांचा राष्ट्रीय मेळावा, दिल्लीत २७ व २८ जुलै रोजी व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अधिवेशन

नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशातील पत्रकारांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा घडवून आणण्यासाठी आणि पत्रकारितेच्या भविष्यासंदर्भात दिशा ठरविण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया (व्ही ओ एम ) व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने २७ व २८ जुलै रोजी नवी दिल्ली येथील विश्व युवा केंद्र येथे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होणाऱ्या या अधिवेशनात देशभरातील विविध राज्यांतील प्रदेशाध्यक्ष, पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.

अधिवेशनादरम्यान पत्रकार संरक्षण, पत्रकारिता क्षेत्रातील बदलते आव्हान, डिजिटल माध्यमांचे वाढते महत्त्व, पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षा योजना, कौशल्य विकास, पत्रकार स्वातंत्र्य, माध्यमांची विश्वासार्हता आणि पत्रकार कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. विविध सत्रांमध्ये देशातील अनुभवी व नामवंत पत्रकार उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून, राज्यनिहाय अनुभव आणि उपक्रमांची देवाणघेवाणही केली जाणार आहे.

या राष्ट्रीय अधिवेशनात पत्रकारांच्या हिताशी संबंधित ३० महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात येणार असून, ते केंद्र सरकारकडे सुपूर्त केले जाणार आहेत. पत्रकारांच्या समस्या आणि अपेक्षा राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे मांडण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी देशभरातील निमंत्रित प्रतिनिधी, पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांना या राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. पत्रकारांच्या एकजुटीला बळ देणारे आणि भविष्यातील दिशा ठरविणारे हे अधिवेशन देशातील माध्यम क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून २३ जुलैला महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई : आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला. आपल्या भविष्याविषयी प्रश्न …