मोबाईल चार्जिंगची समस्या प्रवासात सर्वाधिक भेडसावत असते. त्यामुळे अनेकदा रेल्वे प्रवासी प्रवासात पर्सनल चार्जर, केबल वा पॉवर बँक सोबत बाळगत नाहीत. त्यामुळे प्रवासात मोबाईल चार्जिंग एक मोठी समस्या ठरत असते. यामुळे एअरपोर्ट, रेल्वे स्थानक वा अन्य पब्लिक जागांवर उपस्थित असलेल्या चार्जिंग स्टेशनचा वापर नाईलाजाने प्रवाशांना करावा लागतो. मात्र, असे केल्याने तुमच्या मोबाईलचा डाटा आणि तसेच बँक अकाऊंट खाली होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे अनोळखी ठिकाणी मोबाईल चार्जिंगला ठेवणे धोकादायक ठरु शकते.
मोबाईल फोनची बॅटरी नेहमीच संपते, त्यावेळी अनेकदा चार्जिंगसाठी पॉवर बँक नसल्याने प्रवासी कोणत्याही चार्जिंग पॉवर सेंटरवर मोबाईल फोन चार्जिंगला ठेवून देतात. त्यामुळे मात्र तुमची प्रायव्हसी तर भंग होतेच शिवाय या एका चुकीमुळे तुमचे बँक अकाऊंट रिकामे देखील होऊ शकते. अनेकदा फोनला हँकींग आणि ब्लॅकमेलिंग सारखे प्रकार देखील घडू शकतात.
Shabdraj www.shabdraj.com