24/07/26
Breaking News

सावधान भगर खाताय… मग हे वाचाच…!

शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक उपवास करतात. उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. तुम्ही पण उपवासाला भगरीचे वेगवेगळे पदार्थ करुन खाण्याचे ठरवत असाल तर थोडं थांबा… आधी हे वाचा….

भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. त्यामूळे भगर खाताना थोडी काळजी घ्या. खर तर भगर हा भरड धान्याचा एक प्रकार आहे. भगर तयार करण्यासाठी प्रामुख्याने वरई, सावा, बर्टी व कोद्रा या धान्याचा वापर करतात.

भगर तयार करण्यासाठी उपयोगात आणलेल्या धान्यावरून भगरचे प्रकार पडतात. उदा. बरई भगर, सावा भगर, बर्टी भगर व कोद्रा भगर. वरई भगर सर्वांत उच्च प्रतीची तर कोद्रा भगर सर्वात हलक्या प्रतीची समजली जाते.

भगरीमुळे कार्बोहायड्रेटस आणि डायट्रि फायबर्स मिळतात जे आरोग्यदायी आहेत. याशिवाय भगरीमध्ये कॅल्शिअम, फॉस्परस, मॅग्नेशियम यासारखी खनिजे ही असतात. भगरीचा ग्लायकॉमिक इंडेक्स कमी असल्याने मधूमेही रुग्णांसाठी देखील भगर हा उत्तम आहार आहे. मग अशी सत्वगुणी भगर आरोग्याला अपायकारक का ठरते आहे? या प्रकरणांचा अन्न व औषध प्रशासनाने अभ्यास केला असता या सगळ्याची जी कारणमिमांसा समोर येते ती अशी.

भगरीवर मोठ्या प्रमाणात एस्परजिलस टामारी प्रजातीच्या दूरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्या मूळे फ्युमिगॅक्लाविन ए
सायक्लोपायझॉनिक आम्ल यासारखी विषद्रव्ये तयार होतात. याशिवाय अॅफ्लाटॉक्सिन
एर्गोटॉक्सिन्स यासारखी बूरशीमूळे तयार होणारी मायकोटॉक्सिन्स यामध्ये असू शकतात. २५ ते ३२ सेंग्रे. तापमान आणि आर्द्रता दूरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. अशी दूरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते.

भगर खाताना काय काळजी घ्यावी

बाजारातून भगर आणल्या नंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. अनब्रँडेड किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा.

भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठीकाणी, व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवा, जेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामूळे दूरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका.

शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका, भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता आधिक असते. त्यामूळे पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते, भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी.

मगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच दळा. जाड भगर टाळा

मगर आणि शेंगदाणे हे आधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन तिन दिवस सलग उपवास असतांना या पदार्थाचे सेवन अॅसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थाचे सेवन पचनशक्ती नूसार मर्यादेतच करावे.

भगरीचे सेवन करतांना या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे संभाव्य अपाय टाळता येईल.

भगर विक्रेत्यांसाठी सुचना

विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी.

भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्र., पॅकींग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या.

मुदत बाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये.

सुटी भगर व खूले भगर पिठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये.

उपवास श्रद्धेचा असला, तरी आरोग्याची काळजीही तितकीच महत्त्वाची आहे. सुरक्षित, दर्जेदार आणि मुदतीत असलेली भगरच वापरा. थोडीशी दक्षता घेतल्यास अन्न विषबाधीचा धोका सहज टाळता येतो, काळजी घ्या, दक्ष राहा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न)अनंतकुमार चौधरी यांनी केले आहे..
*

Check Also

महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या प्रदेशाध्यक्षपदी ब्रिजगोपाल तोष्णीवाल विजयी,‘जय महेश’ पॅनलचे बहुमत

परभणी,दि.20(प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या सत्र 2026-29 च्या त्रैवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून …