30/10/26
Breaking News

परभणीला नवे जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण,संजयसिंह चव्हाण होणार सेवानिवृत्त

परभणी,दि.29(प्रतिनिधी) : परभणीच्या जिल्हाधिकारीपदी अण्णासाहेब चव्हाण यांची राज्य सरकारने नियुक्ती केली असून ते 31 ऑक्टोंबर रोजी पदभार स्विकारणार आहेत.
विद्यमान जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे 31 ऑक्टोंबर रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे या रिक्तपदी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी मुंबई येथील मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब दादु चव्हाण यांची सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमरानीकर यांनी या संदर्भातील परिपपत्रक गुरुवारी जारी केले आहे.

Check Also

केशव वाघमारे महाराष्ट्र एक्स लाइन्स पुरस्काराने सन्मानित

औंढा नागनाथ प्रतिनिधी तालुक्यातील येथील सिद्धनाथ नागनाथ अग्रवेट फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून डॉक्टर केशव वाघमारे …