17/08/26
Breaking News

ई बस मध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मोफत सवलतीचा लाभ द्या,व्हाईस ऑफ मीडियाची मागणी,

परभणी, दि१७
अधिस्वीकृती धारक पत्रकारांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस मध्ये मोफत सवलत देण्याची मागणी व्हॉइस ऑफ मीडिया परभणी यांच्या वतीने विभाग नियंत्रक कार्यालय यांच्यामार्फत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या एसटी बस मध्ये आधीस्वीकृती धारक पत्रकारांना मोफत प्रवासाची सवलत दिली जाते, परंतु अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ई बसची संख्या वाढली आहे,त्यासोबतच राज्यात स्लीपर ,( डबल डेकर) बसची संख्या देखील वाढत आहे. परंतु या बसेस मध्ये आधीस्वीकृती धारक पत्रकारांना मोफत सवलत दिली जात नाही, राज्यातील सर्वच आगारात सध्या शिवाई, इलेक्ट्रॉनिक ई बस, शिवनेरी या सह साधी स्लीपर या बसची संख्या वाढली आहे,त्यामुळे पत्रकारांना मोफत सवलतीचा लाभ मिळत नाही
त्यामुळे व्हाईस ऑफ मीडियाने याबाबत आवाज उठवला आहे.
परभणीतील विभाग नियंत्रक कार्यालयातील विभागीय वाहतूक अधिकारी संदीप साळुंखे यांच्यामार्फत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागण्या सादर केल्या आहेत.
एस टी महामंडळाच्या सर्वच बसमध्ये अधिस्वीकृती पत्रकारांना मोफत लाभ द्यावा,आधीस्वीकृतीधारक पत्रकारांना देण्यात येणारे मोफत प्रवासाचे कार्ड स्मार्ट कार्ड स्वरूपात द्यावे,
एसटीच्या कार्डची वैधता ही माहिती व जनसंपर्क विभागाच्या विहित मुदतीप्रमाणे वार्षिक ऐवजी दोन वर्षा करिता कार्ड देण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण, कार्याध्यक्ष विजय कुलकर्णी, महानगर अध्यक्ष नरहरी चौधरी, साप्ताहिक विंगचे प्रदेश उपाध्यक्ष नेमिनाथ जैन,जिल्हा उपाध्यक्ष संग्राम खेडकर,परभणी तालुका अध्यक्ष संतोष मगर आदींची यावेळी उपस्थित होती.

….. पत्रकारांसोबत दूजाभाव का?

नवीन आलेल्या ईबस,स्लीपर बस यामध्ये सर्व घटकांना सुविधा दिल्या जात असताना पत्रकारांना का वगळण्यात आले असा सवाल जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला. या प्रश्नावर लवकरच, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे,प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Check Also

व्यापार व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल व्यापारी बांधवांचा गौरव

हिंगोली, दि 08 हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने व्यापार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या …