26/06/26
Breaking News

पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांची आमदार तानाजी मुटकुळे यांनी घेतली सदिच्छा भेट

हिंगोली (प्रतिनिधी)
जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार मुटकुळे यांनी नूतन पोलीस अधीक्षक लोढा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांना हिंगोली जिल्ह्यातील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या सदिच्छा भेटीदरम्यान आमदार तानाजी मुटकुळे आणि पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्यात हिंगोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. तसेच, सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि गुन्हेगारीमुक्त हिंगोली घडवण्यासाठी लोकप्रतिनिधी व पोलीस दल यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचा सूर या भेटीदरम्यान उमटला.
यावेळी जेष्ठ नेते के.के.शिंदे,माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,जिल्हा सरचिटणिस उमेश नागरे,जिल्हा प्रवक्ता विलास गोरे,शहराध्यक्ष रजनीश पुरोहीत,कार्याध्यक्ष पवन उपाध्ये,सभापती माणीक लोडे,सदाशिव सुर्यतळ,संदीप वाकडे,ॲड.पठाडे,नितीन राठोड,कैलाश बुळे,गुड्डू देवकते उपस्थित होते.

Check Also

श्री शिवाजी पॉलिटेक्निकमध्ये बांधकाम कंत्राटदारांसाठी काँक्रीट प्रयोगशाळा भेट व प्रात्यक्षिक कार्यक्रम

परभणी,दि 24 ः परभणी येथील म. शी प्र मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये दि. …