मोठी खूशखबर; 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ‘या’ विभागात नोकरी

0 91

तुम्ही जर चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. न्युक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स (Nuclear Fuel Complex) मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. बारावी उत्तीर्ण ते ग्रॅज्युएशनपर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्याची मुदत ही 10 एप्रिल 2023 पर्यंत आहे. ‘एबीपी न्यूज’ने याबाबत वृत्त दिलंय.

न्युक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स मध्ये विविध 100 पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातेय. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची मुदत

न्युक्लिअर फ्लुएल कॉम्प्लेक्सने भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार संस्थेत विविध विभागांमध्ये रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. ज्यासाठी उमेदवार 10 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करू शकतील.

अर्ज कुठे कराल? 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना संस्थेची अधिकृत वेबसाईट nfc.gov.in वर जाऊन भरतीसाठी अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी जी मुदत दिली आहे, त्या मुदतीमध्ये ज्या उमेदवारांचे अर्ज येतील, त्यांनाच या भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल.

उमेदवारांची निवड

उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, अ‍ॅडव्हॉन्स टेस्ट, शारीरिक मूल्यमापन टेस्ट, कमांड टेस्ट, वैयक्तिक मुलाखत आणि ड्रायव्हिंग टेस्टच्या आधारे केली जाईल.

अशी आहेत रिक्त पदं

न्युक्लिअर फ्लुएल कॉम्प्लेक्सच्या अधिसूचनेनुसार ही भरती प्रक्रिया एकूण 124 पदांसाठी राबवली जात आहे. यामध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी/अ (01), टेक्निकल अधिकारी/क (कॉम्प्युटर) (03), उपमुख्य अग्निशमन अधिकारी/अ (02), स्टेशन अधिकारी/अ (07), उप अधिकारी/ब (28), ड्रायव्हर-पंप ऑपरेटर-फायरमन/ए (83) आदी पदांचा समावेश आहे.

पात्रता

या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार पदानुसार 10+2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयातील ‘बी.ई’ किंवा ‘बी.टेक’ पदवी असावी. तसेच उमेदवाराकडे अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

पदानुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांच कमाल वय 27, 35, 40 वर्षं असावं. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. तसंच भरतीबाबत अधिक माहिती संस्थेची अधिकृत वेबसाईट nfc.gov.in वर देण्यात आली आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवार संबंधित वेबसाईटला भेट देऊन 10 एप्रिल 2023 पूर्वी अर्ज करून भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

error: Content is protected !!