सॅटॅलाइट लॉन्च व्हेईकल मिशनसाठी देवगिरी ग्लोबल अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांची निवड

0 37

परभणी दि.19
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाऊस ऑफ कलाम इंडिया, मार्टिन ग्रुप यांच्या वतीने “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटॅलाइट लॉन्च वेहिकल मिशन २०२३” साठी मशिप्र संचलित देवगिरी ग्लोबल अकॅडमीच्या विद्यार्थिनी कु. देवश्री आनंद पाथ्रीकर आणि कु. अक्षदा रवी राजगुरू यांची निवड करण्यात आली आहे. या मिशन अंतर्गत दीडशे पिको सॅटॅलाइट बनविले जाणार आहेत. हा विश्वविक्रम करण्यासाठी या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे परभणी येथे २२ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांची कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणाऱ्या या उपक्रमाद्वारे राष्ट्रीय स्तरावरील शंभर विद्यार्थ्यांना चेन्नई येथे दोन दिवसीय रॉकेट बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी पट्टीपुरम येथून मुलांनी बनविले सॅटॅलाइट व रॉकेटचे प्रक्षेपण केले जाणार आहे यासाठी राज्य समन्वयक मनीषा चौधरी, मुख्य सचिव मिलिंद चौधरी, परभणी जिल्हा समन्वयक मेघ श्याम पत्की, राजकुमार भामरे, संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर सदरील उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. या उपक्रमात निवड झाल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळंके, सतीश चव्हाण शाळेचे संचालक अनिल नखाते, प्राचार्य शुभांगी काळपांडे आणि विज्ञान शिक्षिका स्नेहल पाटील आदींनी स्वागत केले आहे.

error: Content is protected !!