लाखनी तालुक्यातील ग्राम. सोमलवाडा परिसरात ओला दुष्काळ जाहीर करा ! जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

0 55

 

लाखनी – येथील दि . ० ९ / १० / २०२२ पासून सतत पाऊस चालू असल्याने हलक्या व भारी धानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे सदर परीसरातील शेतीचे पंचनामे करुन त्वरीत शेतकऱ्यांना आर्थीक लाभ द्यावा अशी मागणी सोमलवाडा ग्रा.प.चे उपसरपंच तथा शेतकरी संघटनेचे मार्गदर्शक विश्वजीत हुमणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे.

 

dr. kendrekar

लाखनी सोमलवाडा परीसरात गेल्या अनेक दिवसापासुन परतीच्या पावसाने जोर धरला असुन ऐन हातावर आलेल्या धान पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी हवादिल होवून चिंतेत पडला आहे.

 

त्यामुळे तात्काळ यंत्रणेने लक्ष घालून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करावे , झालेल्या नुकसानीचा आढावा घेवून तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी हेक्टरी २५००० रू . पंचवीस हजार रूपये मदत द्यावी शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर गर्दीत उभे ठेवण्यापेक्षा त्याचे ७/१२ नोंदणी व्यवस्था गावपातळीवर करावी धानाला नुकसानभरपाई व बोनस तात्काळ जाहीर करावा अश्या विविध मागण्यांचे निवेदणाव्दारे मागणी केली आहे.

error: Content is protected !!