शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी महाविकास आघाडीचा प्लॅन काय?

0 169

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी होणारी निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचा निर्णय मविआच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत घेण्यात आलाय. नाशिक (Nashik) आणि अमरावतीची(Amravati) जागा काँग्रेस(Congress) लढवणार असून, नागपूरची (Nagpur)जागा ठाकरे गट (Uddhav Thackeray)लढवणार आहे. तर संभाजीनगरची (Sambhajinagar)जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) गेली आहे. तर कोकणातून(Konkan) शेकाप मैदानात उतरणार आहे. वाय.बीचव्हाण सेंटरमध्ये झालेल्या बैठकीला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

 

महाविकास आघाडी पाचही जागा निवडून येईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच, नागपूरची जागा शिवसेनेला दिली असली तरीही यासाठी कॉंग्रेसही मदत करणार आहे. या जागांसाठी लवकरच उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे.

 

भाजप-शिंदे गटात धुसफूस
या निवडणूकांवरून भाजप आणि शिंदे गटात मतभेद असल्याचे दिसून येत आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीनंतर आता ही धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी आम्हाला विचारात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्याचा शिंदे गटाने आरोप केला आहे. त्यामुळे दोघांमध्ये सर्व काही आलबेल सुरू असल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!