‘या’ कारची किंमत आहे ३ लाखांच्या आत

2 451

प्रत्येकाला आपली स्वतःची कार असावी वाटते. जुनी किंवा नवी पण एखादी कमी किंमतीतील कार घेण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. आता नवीन कारच आपणास अतिशय माफक दरात मिळणार असल्याने आपले हे स्वप्न सहज साकार होणार आहे.

यात पहिली कार मारुती सुझुकी ऑल्टो. दिल्लीतील एक्स शोरुममध्ये २.९४ लाख रुपयांपासून सुरुवात होते. ही कार २२.०५ किलोमीटर प्रती लिटर मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे . ही कार पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. सीएनजी वर ३१.५९ किमी प्रति लीटर मायलेज देते.

तर ७९६ सीसी, ३-सिलिंडर, १२-वाल्व, BS-६ इंजिन आहे. तर इंजिन ६००० आरपीएम वर ४८PS ची पॉवर आहे. ३५०० आरपीएम वर ६९ Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. तसेच पॉवर स्टीयरिंग, अँटी-लॉक ब्रेक सिस्टम, ड्रायव्हर एअरबॅग, पॅसेंजर एअरबॅग फ्रंट पॉवर विंडो फीचर्स उपलब्ध आहे.

त्यानंतर रेनॉ क्विड ही कार येते ज्याची दिल्लीत एक्स शोरूम किंमत २.९४ लाख रुपये आहे. या कारचे मायलेज मारुती अल्टोपेक्षा अधिक आहे, कंपनीने दावा केला आहे की ही कार एका लिटरमध्ये २५.७ किमी चालवू शकते. तर ०.८ लीटर इंजिन मध्ये ५६०० आरपीएमवर ५४ पीएसचे पॉवर आणि ४२५० आरपीएमवर ७२ एनएमचे टॉर्क जनरेट आहे.

 

तर इंजिन मॅन्यूअल ट्रान्समिशन मॉडल २१.७४ किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज आहे. तसेच ०.८ लीटर इंजिन मॅन्यूअल ट्रान्समिशन मॉडल २०.७१ किलोमीटर मायलेज आहे.

 

त्यानंतर दॅटसन टसन रेडी गो ही कार येते, या कारची किंमत किंमत २.८६ लाखांपासून सुरू होते. १ लीटर इंजिन ५५०० आरपीएमवर ६८ पीएसचे पॉवर आणि ४२५० आरपीएमवर ९१ एनएम चे टॉर्क जनरेट आहे. कारचे मायलेज २२ किलोमीटर प्रति लीटर आहे.

error: Content is protected !!