क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान आणि यशस्विनी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना प्रतिबंध लसीकरण कॅम्पेनचा शुभारंभ

0 66

खडकवासला, प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकरांच्या क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान आणि यशस्विनी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वीर बँक्वेट हॉल येथे आयोजित केलेल्या अकराव्या कोरोना प्रतिबंध लसीकरण कॅम्पेन चा शुभारंभ केला.

यानिमित्ताने रूपाली चाकणकरांना आज परिसरातील नागरिकांशी संवाद साधण्याचा योग आला. उपस्थित महिलांना लसीकरणानंतर घ्यावयाची आरोग्याची काळजी याबाबतही माहिती देण्यात आली. त्यांच्या या प्रतिष्ठान च्या माध्यमातून गेली दिड महिन्यापासून सिंहगड रोड भागातील वेगवेगळ्या प्रभागात लसीकरण केंद्र चालू आहेत. एकंदरीत केलेल्या उपाययोजनांबाबत इथल्या नागरिकांमध्ये समाधान असल्याचे जाणवले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर, त्र्यंबकआण्णा मोकाशी (अध्यक्ष रा. काँ.पार्टी खडकवासला ग्रामीण) तसेच आयोजक दत्ता नाना रायकर, सौ. सुनीता डांगे, योगेश बोराटे, विकास गायकवाड, शाम रायकर, भाग्यश्री कामठे, रोहित रायकर हे उपस्थित होते.

error: Content is protected !!