रणजित कारेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेटचे वाटप,पाणी वीज बचत गटाचा उपक्रम

0 122

परभणी,दि 12 (प्रतिनिधी)ः
परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते, पाणी वीज बचत गटाचे अध्यक्ष रणजीत कारेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना ११ जानेवारी रोजी ब्लॅंकेटचे वाटप करून विधायक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
दर वर्षी रणजित कारेगावकर यांचा वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. यापूर्वी देखील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शिलाई मशीनचे वाटप, गरजू रुग्णासांठी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांसाठी खिचडीचे वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले. यावर्षी देखील पाणी वीज बचत गट मित्र परिवाराच्या वतीने परभणी रेल्वे स्टेशन, बस स्टँड परिसर, जिल्हा रुग्णालय परिसर आदी ठिकाणी बसलेल्या निराधार, गरजूना थंडी पासून बचाव व्हावा यासाठी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी अस्थिरोग तज्ञ डॉ. केदार खटींग, हृदय रोग तज्ञ डॉ. रामेश्वर नाईक, मानसोपचार तज्ञ डॉ.जगदीश नाईक, सुरेश मोहिते, बंडू मगर, विष्णू मेहेत्रे, रणजित कारेगावकर आदींच्या हस्ते पन्नास गरजू लोकांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!