जितरत्न पटाईत यांची वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती

सामान्य कार्यकर्ता ते सोशल मीडिया प्रमुख

0 18

मुंबई : प्रबुद्ध भारत या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक पाक्षिकाच्या ‘वृत्तसंपादक’ पदाची धुरा आपल्या खांद्यावर पेलून आंबेडकरी विचार घराघरांत पोहचवणारे जितरत्न पटाईत यांची वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी समाज माध्यमांवर जाहीर केले.

वंचित बहुजन आघाडी हा पक्ष राज्यातील शोषित, पीडित समूहांच्या प्रश्नांवर सातत्याने लढत आहे. अन्यायग्रस्तांना न्याय द्यायचे कार्य करत आहे. अशावेळी सध्याच्या काळात समाज माध्यम खूप महत्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणून पक्षाने जितरत्न पटाईत यांच्यासारख्या तडफदार युवकाच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली. सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, शैक्षणिक स्तरातून राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

 

सामान्य कार्यकर्ता ते सोशल मीडिया प्रमुख !

जितरत्न पटाईत हे विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक चळवळीत सक्रिय होते. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. 2017 पासून ते माध्यम क्षेत्रात सक्रिय आहेत. प्रबुद्ध भारतचे संपादक तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने प्रबुद्ध भारतच्या वृत्तसंपादक पदाची धुरा ते सांभाळत आहेत.

जितरत्न पटाईत यांना त्यांच्या कामाबद्दल विविध स्वयंसेवी संस्थेकडून गौरविण्यात आले आहे. डी.जी. राजहंस मेमोरियल फाउंडेशन कोल्हापूर, अहिराणी कस्तुरी मंच, जळगाव, भारतीय बौद्ध महासभा पुणे शहराच्यावतीने दिला जाणारा मूकनायक पत्रकारिता पुरस्कार, परभन्ना फाउंडेशन नांदेड यांचा सेवाकार्य कृतज्ञात पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

 

 

वंचित हा सर्व समाज घटकातील सर्वसामान्यांचा पक्ष – जितरत्न पटाईत

माझासारख्या एका सर्वसामान्य घरातील युवकावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा. प्रकाश आंबेडकर तसेच पक्षाने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली याचा निश्चितच आनंद आहे. आज परत एकदा वंचित हा सर्व घटकातील सर्वसामान्य लोकांचा पक्षा असल्याचे यातून अधोरेखित झाले. या नियुक्तीला आपल्या कार्यातून सार्थ करू असा विश्वास आपल्या नियुक्ती विषयी माध्यमांना बोलताना जितरत्न पटाईत यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!