शुक्रवारी मनपाचे आरक्षण निश्‍चित प्रभाग रचनेसह सोडत निघणार

0 31

 

परभणी,दि.01(प्रतिनिधी) : महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवरप्रारूप प्रभाग रचना व सोडत पध्दतीने आरक्षण निश्‍चिती शुक्रवार ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने निवडणूक आयोगाद्वारे प्रक्रिया सुरु झाली आहे. विशेषतः या प्रक्रियेंतर्गत प्रारुप प्रभाग रचना व सोडत पध्दतीने आरक्षण येत्या शुक्रवारी निश्‍चित केले जाणार आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती(महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्‍चित करण्याकरीता सोडत काढली जाणार आहे.
येथील बी. रघुनाथ सभागृहात ही प्रक्रिया पूर्ण होणार असून त्या पाठोपाठ शनिवारी (दि.06 ऑगस्ट) आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध होणार आहे. लगेचच 12 ऑगस्टपर्यंत आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी असणार आहे. संबंधितांनी हरकती व सूचना महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय मुख्यालय अथवा सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती अ,ब,क यांचे कार्यालय येथे सादर कराव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

error: Content is protected !!