आता सातबारा उतारा बंद… मिळणार प्रॉपर्टी कार्ड..

प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?

0 564

आपण जमिनीचे मालक आहोत हे सिध्य करण्यासाठी सातबारा हा एक पुरावा असतो. पण आता सातबारा बंद होणार आहे. हा सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख कार्यालयाने घेतला आहे. आता राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले आहेत. त्या ठिकाणी सातबाऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड (Property card) सुरू करण्यात येणार आहे.

नरेंद्र मोदी सरकारनं सामान्य नागरिकांसाठी स्वामित्व योजना आणली आहे. या योजनेविषयी 2021 सालचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं, “स्वामित्व योजना आता देशभरातल्या सगळ्या राज्यांमध्ये राबवली जाणार असून यामुळे ग्रामीण नागरिकांना त्यांच्या घराचं आणि जमिनीचं प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे. ”

पण, प्रॉपर्टी कार्ड नेमकं काय असतं? त्याचे फायदे काय आहेत? याची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.

ज्यापद्धतीनं साताबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिलेली असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावानं किती बिगर शेतजमीन आहे, याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते. म्हणजे काय तर बिगर शेतजमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजेच घर, बंगला, व्यवसायाची इमारत आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर नमूद केलेली असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वामित्व योजनेच्या माध्यमातून देशभरातील सगळ्या गावांचं ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या केलेल्या सर्वेक्षणाच्या द्वारे प्रत्येक गावातील घराचा नकाशा, व इतर प्रकारच्या मिळकत पत्रिका उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक गावातील प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल. घराची मालकी आपलीच आहे व त्यावरील कायदेशीर अधिकार हा आपलाच आहे. त्या प्रॉपर्टीविषयी आपण काय करायचं याचा सर्वस्वी निर्णय हा तुमचा स्वतःचा राहणार आहे. यामध्ये सरकारला सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेता येता येणार नाही.

जमिनीच्या मालकीच्या प्रमाणपत्रात नमूद केलेले तपशील
जमीन मालकाचे नाव
जमीन मालकाच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव
जमीन मालकाचा पत्ता
जमिनीच्या पार्सलचा प्लॉट क्रमांक
एकूण क्षेत्रफळ
सरकारी संस्थांकडून जमीन मालकाने घेतलेल्या कर्जाशी संबंधित तपशील
प्रलंबित खटल्यांचा तपशील
जमिनीवर आकारलेल्या आणि न भरलेल्या कराचा तपशील
ज्या ठिकाणी जमीन पार्सल अस्तित्वात आहे
जमीन मालकाची स्वाक्षरी
जमीन मालकाने भरलेल्या नोंदणी शुल्क किंवा मुद्रांक शुल्काचा तपशील
जिल्हा महसूल अधिकारी किंवा तहसीलदार यांची स्वाक्षरी
जिल्हा महसूल अधिकारी किंवा तहसीलदार यांचे पूर्ण नाव
सक्षम शासकीय कार्यालय किंवा प्राधिकरणाचा अधिकृत शिक्का
मालकी प्रमाणपत्र जारी करण्याची तारीख

error: Content is protected !!