गडकिल्ले संवर्धन संस्था आयोजित सिंहगड वरील विद्युत रोषणाई या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला युवा नेते पराग ढेणे यांची भेट

0 167

खडकवासला, प्रतिनिधी – दिवाळीची सुरवात एवढी सुंदर होईल ही अपेक्षा न्हवती. आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस यानिमित्ताने महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर गडसंवंर्धनाचे काम करणारी गडकिल्ले संवर्धन संस्थेकडून ऐतिहासिक किल्ले सिंहगड वर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यानिमित्ताने निमंत्रित कार्यक्रमाला आज युवा नेते पराग ढेणे यांनी भेट दिली.

आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा वेळ गडकिल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील शिवभक्त देत असतात,याच कौतुक वाटत. ही सगळी लोकं एका ध्येयाने पछाडलेली असतात आणि ते ध्येय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना समजावा त्यांच्या किल्ल्याबद्दल सर्वांच्या मनात आदर निर्माण व्हावा. गडसंवर्धन करणारा प्रत्येक जण किल्ला आपल्या घराप्रमाणे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.

सिंहगड वर मी बऱ्याचदा गेलो पण आज खूपच अप्रतिम अशी विद्युत रोषणाई आज सिंहगडवर पाहायला मिळाली. त्यातच कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील ज्योत्याजी केसरकर या मावळ्याची भूमिका करणारे अभिनेते गणेश लोणारे यांचा सन्मान देखील युवा नेते पराग ढेणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बराच इतिहास डोळ्यासमोर तरळत असल्याचा भास होत होता.

गडकिल्ले संवर्धन समिती आणि इतर अनेक संस्थांना या माध्यमातून पराग ढेणे यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशा अनेकानेक कार्यक्रमांचा जागर हा प्रत्येक किल्ल्यावर व्हावा हीच मनोकामना व अशी प्रतिक्रिया युवा नेते पराग ढेणे यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!