“राष्ट्रीय सेवा योजनेची युवाशक्ती हीच राष्ट्राची खरी संपत्ती “-डॉ. अशोककुमार पगारिया

0 37

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे, प्रीतम प्रकाश कला व वाणिज्य महाविद्यालय, इंद्रायणी नगर,भोसरी. राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर कोहिनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे. येथे दि.16 डिसेंबर 2022 ते 22 डिसेंबर 2022 दरम्यान संपन्न होत असून या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांनी प्रतिपादन केले.

 

आजच्या भौतिक-तांत्रिक युगामध्ये श्रम संस्कार हरविलेल्या युवा पिढीला राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरातून श्रमसंस्कार, ग्रामीण संस्कृती व ग्रामीण जीवन या गोष्टींचा परिचय होत असून यातून श्रमसंस्काराचे मूल्य आजीवन पुरणारे आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की, शरीर, मन व श्रम यांचा समन्वय साधल्यास आरोग्य व्यवस्थित राहील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सरपंच वैशालीताई पांडुरंग कोहिनकर या होत्या.

 

 

अध्यक्ष मनोगतामध्ये त्यांनी येणारे सात दिवस हे आमच्या गावासाठी एक नव-पर्वणी आहे कारण गावाच्या विविध कामांची पूर्तता राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून राबविण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून स्वयंसेवक व स्वयंसेविकांच्या माध्यमातून जनजागृती व प्रबोधन केले जाते असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे मा. अविनाश कोहिनकर, मा. ग्रामसेवक, किशोर रायसिंगवाकडे, मा. रघुनाथ कोहिनकर, अॅड. हौशीराम कोहिनकर, मा. पांडुरंग कोहिनकर, मा. पाठक सर कोहिनकर वाडी गावातील ग्रामपंचायत आजी-माजी पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुधाकर पंडित बैसाणे यांनी केले. त्यात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजना मागील उद्देश व सात दिवसाच्या कार्यक्रमाचे स्वरूप मान्यवरांसमोर मांडणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विभा ब्राह्मणकर यांनी आपल्या खास शैलीत केले.

 

 

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव कांबळे, प्रा. पांडुरंग भास्कर, डॉ. विजय निकम, प्रा. प्रशांत रोकडे,प्रा.राजेश कुंभार, सौ.लता शेळकंदे व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे 50 शिबिरार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे उपस्थितांचे आभार व ऋण डॉ.विजय निकम यांनी व्यक्त केले व उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!