12/04/26
Breaking News

जिल्ह्यातील सर्व शाळांची होणार पटपडताळणी

परभणी,दि 08 ः
जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवी आणि इयत्ता नववी ते अकरावी च्या विद्यार्थ्यांची पट पडताळणी दिनांक 11 ते 22 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक सविता बिरगे यांनी दिली आहे.

सदरची पट पडताळणी करण्या बाबतच्या सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी परीक्षेच्या दिवशी म्हणजेच दिनांक 11 ते 22 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये करण्याबाबत सूचित करण्यात आली आहे.

या पटपटळणीच्या अनुषंगाने इयत्ता नववीचे मराठी गणित आणि इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा अनुक्रमे 11 एप्रिल 15 एप्रिल आणि 22 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्या बाबत राज्य शासनाच्या सूचना प्राप्त आहेत.

जिल्ह्यातील शाळांची पटपडताळणी करण्याचे अनुषंगाने स्टुडंट पोर्टलवर HM Login, Cluster Head Login, BEO Login व EO Login वर सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पटपडताळणीच्या अनुषंगाने शाळेस भेट देणारे पथक उपरोक्त लॉगीनचा वापर करुन हजर व गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करतील.

शाळांची पटपडताळणी करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, अधीक्षक (शालेय पोषण आहार), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) चे अधिव्याख्याता, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकचे अधीक्षक व विस्तार अधिकारी संवर्ग इ. यांचे पथक शाळेस प्रत्यक्ष भेट देवून पटपडताळणीसाठी कार्यवाही करणार आहे.

….
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची पटपडताळणी करणे अनिवार्य असणार आहे. तेव्हा संबंधित शाळांनी आपले विद्यार्थी शंभर टक्के उपस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
सविता बिरगे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

Check Also

संत साईबाबांचे गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या जीवनावरील ग्रंथाचे प्रकाशन

सेलू दि ११(प्रतिनिधी) शिर्डीच्या साईबाबांचे गुरू तथा शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या चरित्राचे …