परभणी, दि. 08 : भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉरपोरेट अफेअर्स अंतर्गत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरु करण्यात आली असून जिल्ह्यातील युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत खंदारे यांनी केले आहे.
या योजनेसाठी 18 ते 25 वयोगटातील पुर्णवेळ शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण किंवा नोकरीत नसलेला भारतीय युवा वर्ग पात्र आहे. या योजनेअंतर्गत देशातील नामांकित कंपन्यांमध्ये 6 ते 9 महिन्यांचे प्रशिक्षण (इंटर्नशिप) दिले जाणार असून प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा रु. 9,000 आर्थिक सहायता तसेच एकरकमी रु. 6,000 देण्यात येणार आहे.
इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदविण्यासाठी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावरील ‘Register Now’ या टॅब वर क्लिक करून नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आधार क्रमांकास मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक असून संबंधित मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठविण्यात येतो. त्यानंतरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.
जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी दि. 10 एप्रिल 2025 पर्यंत नोंदणी करून या प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी येथे संपर्क साधावा.
Shabdraj www.shabdraj.com