04/02/26
Breaking News

मराठवाडा

पीएम धन धान्य कृषी योजनेला मंजुरी;1.7 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ!

देशातील शेतकऱ्यांना  पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता कधी मिळणार याची उत्सुकता असतानाचा आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये  पीएम धन धान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. 24 हजार रुपये दरवर्षी खर्च होणाऱ्या, विविध 36 योजनांना एकत्र आणलेल्या पीएम धन-धान्य कृषी योजनेला केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाल्याची माहिती, केंद्रीय प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या योजनेमुळे देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार …

Read More »

टरबुजाचे बियाणे निघाले बोगस,शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

रमेश बिजुले पाथरी,दिनांक 14 ः पाथरी तालुक्यातील उमरा, गौंडगाव, गुंज, कोल्हावाडी रत्नापूर या शिवारात शेतकऱ्यांनी लागवड केलेले  टरबूज बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तालुक्यातील भोई समाजातील व इतर शेतकऱ्यांनी ही लाईट सीड्स सुरुची या संकरित टरबुज बियाणांची लागवड जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात …

Read More »

शिवसेना पक्ष, धनुष्यबाण कुणाचा? ऑगस्ट महिन्यात काय होणार…

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरु असलेला वाद आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. सर्वोच्च न्यायालयात  या खटल्याच्या सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने महत्त्वाच्या सूचना दिल्या. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आजच्या सुनावणीत एक महत्त्वाची टिप्पणी केली. त्यांनी ठाकरे गटाला  सांगितले की, आता या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. तुम्ही त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे बंद करा. हे प्रकरण …

Read More »

भारतीय जनता पार्टीची पुर्णा शहर कार्यकारणी जाहीर

पूर्णा,दि 14 ः भारतीय जनता पार्टीची पूर्णा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.पूर्णा शहर सरचिटणीस निलेश सुभाषआप्पा कुऱ्हे राम अंगदबुवा पुरी,उपशहर अध्यक्ष माऊली बालासाहेब कदम,पंकज धीरज राठोड,वैभव अशोक जिरवणकर,ओम किशनलाल यादव,नामदेव नारायण खंदारे,शहर कोषाध्यक्ष महेश मंचकराव किरडे,शहर सचिव विजय खिलोशिया युवा मोर्चा शहर अध्यक्ष गंगाधर रामचंद्र महामुने ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष राजेश श्यामलाल यादव महिला आधाडी शहर अध्यक्ष साधनाताई बिछडे उपशहर अध्यक्ष सविताताई अशोक …

Read More »

वीर शिवा काशिद व वीर बाजी प्रभू देशपांडे यांना अभिवादन

पूर्णा,दि 14 ः पूर्णा शहरात प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी जिवा सेना संघटना व जिवाजी महाले मित्र मंडळ पूर्णा यांच्या वतीने दिनांक 11 /7/ 2025 वार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक पूर्णा या ठिकाणी शूर वीर शिवा काशिद व बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी माननीय साहेबराव कल्याणकर दाजी मा माऊली कदम मा माधव आवरगंड सोनाजी शिंदे …

Read More »

हात मदतीचा प्रेरणादायी उपक्रम–एकनाथ जाधव

शारदा विद्यालयात गणवेश वाटप सेलू / प्रतिनिधी – सेलू शहर व तालूका पुरोगामी विचारांचा आदर करणारा असून सामान्य, होतकरू, ग्रामीण,शेतकरी, कष्टकरी , कुटुंबातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांचा हात मदतीचा अंतर्गत आतापर्यंत शहरातील विविध शाळेतील 2500 विद्यार्थ्यांना केलेली शैक्षणिक मदत प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन केंद्रप्रमुख एकनाथ जाधव यांनी केले.   येथील कै.सौ. राधाबाई …

Read More »

शिष्यवृत्ती परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे यश

सेलू,दि 11ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून भा.शि.प्र.संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालय सेलू येथील ०६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. इयत्ता ५ वी तुन चि. आदित्य गिरी (जिल्ह्यात ५१ वा ), कु.अनन्या कोल्हे (जिल्ह्यात ८५ वी),चि. आरुष ताठे (जिल्ह्यात ८७ वा) शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.इयत्ता ८ वी तुन रुद्र गुंगाणे (जिल्ह्यात ४३वा …

Read More »

मुजोर संस्थाचालकाच्या मारहाणीत पालकाचा मृत्यु, झिरोफाटा येथील घटना, पती-पत्नीवर गुन्हा दाखल

पूर्णा,दि 11 (प्रतिनिधी)ः मुलीची टीसी आणायला गेलेल्या पालकाला संस्थाचालकाने जबर मारहाण केली. या मारहाणीत पालकाचा मृत्यू झाला ही घटना पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथे हायटेक रेसिडेन्शिअल स्कूल येथे दहा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात अकरा जुलै च्या पहाटे दीडच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा परिसरात असणाऱ्या हायटेक रेसिडेनशियल स्कूलमध्ये एक …

Read More »

शरद आंबेकर यांची अपर कोषागार अधिकारी पदावर बदली

परभणी – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, परभणी यांच्या कार्यालयात लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले शरद आंबेकर यांची प्रशासकीय बदली होऊन त्यांची नियुक्ती अपर कोषागार अधिकारी, वर्ग-2, राजपत्रित अधिकारी म्हणून जिल्हा कोषागार कार्यालय, परभणी येथे झाली आहे. त्यांनी दिनांक ४ जून २०२५ रोजी नव्या पदावर रुजू होऊन कार्यभार स्वीकारला.   श्री. आंबेकर हे जानेवारी २००९ पासून महाराष्ट्र राज्य वित्त व लेखा सेवेत …

Read More »

वंदे भारत एक्स्प्रेसचा मुहूर्त ठरलां..परभणी मार्गे धावणार

परभणी,दि 09 ः भारतीय रेल्वेचा अभिमान आणि भारताची स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन – वंदे भारत एक्सप्रेसने – महाराष्ट्रातील मराठवाड्यातून आपला पहिला प्रवास दिनांक 30 डिसेंबर, 2023 पासून सुरु केला होता. भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर, 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जालना ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले होते.या …

Read More »