17/07/26
Breaking News

विवेकानंद विद्यालय केवळ शिक्षणाचे केंद्र नसून शिस्त, गुणवत्ता आणि संस्काराचा त्रिवेणी संगम!

सेलू (प्रतिनिधी):
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ही केवळ शिक्षणाचे केंद्र नसून ती शिस्त, गुणवत्ता ,संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी मातृसंस्था आहे. भारतीय संस्कृतीचे जतन करणारे आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे सुजाण नागरिक या विद्यालयात घडवले जातात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. ज्योती दीपकसिंह ठाकूर यांनी केले.
विवेकानंद विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर स्थानिक समितीचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर, मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे, स्नेहसंमेलन प्रमुख गजानन साळवे आणि सहप्रमुख अश्विनी पावसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाणी आणि नृत्यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील वैविध्यपूर्ण सणांचे दर्शन घडवले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वप्नाली देवडे व चंद्रकांत कव्हळे यांनी केले.विवेकानंद विद्यालयाचे सहशिक्षक अनिकेत प्रदीप भिलेगावकर यांनी आपल्या मातोश्रींच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विद्यालयाला एक शिक्षक कपाट भेट दिले.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …