सेलू ( प्रतिनिधी ) थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा पाथरी कॉर्नर परिसरात बसवावा अशी मागणी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे सेलू तालुक्यातील फुले प्रेमी कडून होत आहे.
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सेलू शहरातील फुलेनगर येथे नगरपालिका सेलू यांच्या वतीने जयंतीदिनी पुरेसा मंडप, विद्युत रोषणाई, ध्वनीक्षेपक, फुलांची सजावट, शुभेच्छा फलक कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. महाराष्ट्र शासन महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त जीआर काढून विविध योजना व कार्यक्रम राबविण्याची आयोजन करत असताना सेलू नगरपालिका प्रशासन या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सेलू तालुक्यातील फुले प्रेमींच्या भावनांचा उद्रेक होत असून भावना दुखवल्या जात आहेत.
दरवर्षीच महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी सेलू नगरपालिकेकडून कोणत्याही सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत असे नागरिकांची म्हणणे आहे दोन दिवस अगोदर सूचना देऊन देखील याकडे नगरपालिका कर्मचारी जाणून बुजून दुर्लक्ष करतात की काय अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
या ठिकाणी जमलेल्या फुले प्रेमी कडून राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा पाथरी कॉर्नर परिसरात बसवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती अशोक नाना काकडे, संजय साडेगावकर, अशोक उफाडे,विलास सोनवणे, भागवत दळवे, पंडित महाराज रासवे, ऍडव्होकेट प्रभाकर गिराम, प्रभाकर इंगळे, तसेच सेलू तालुक्यातील फुले प्रेमी यांची उपस्थिती होती.
Shabdraj www.shabdraj.com