जिंतूर / प्रतिनिधी
जिंतूर : शहरातील सामाजिक उपक्रमांना नवी दिशा देण्याकरीता पालकमंत्री ना मेघना बोर्डीकर यांच्या अभिष्टचिंतन दिनाचे औचित्य साधून शहरात आयुष्यमान सेवा सप्ताहाच्या निमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉ.समीर जनिमिया यांच्या पुढाकाराने आरोग्यविषयक जनजागृतीसह आयुष्यमान कार्ड वाटपाची विशेष मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत तब्बल पंधराशे लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेची कार्डे वितरित करण्यात आली.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे उदघाटन डॉ पंडित दराडे, गोविंद थिटे, टीका खान, विलास भंडारे, गणेश कुरहे, राजेश राठोड, विजय जाधव, जिल्हा आयुष्यमान भारतचे प्रमुख अब्दुल करीम, आरोग्य मो यासेर, मुंजाजी पुरनस्कर, सुलोचना चौधरी आदींची उपस्थिती होती. सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाचे नेतृत्व डॉक्टर समीर जानीमिया यांनी पुढाकाराने केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन नागरिकांची नोंदणी केली तसेच पात्र लाभार्थ्यांना तत्काळ कार्ड वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली. अनेक कुटुंबांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
मोहीमेदरम्यान आरोग्यविषयक माहिती देत नागरिकांना योजनांची सविस्तर माहितीही देण्यात आली. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या संदेशाला अधोरेखित करत समाजातील वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमामुळे जिंतूर शहरात आरोग्यसेवेबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली असून, भविष्यातही अशाच लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
Shabdraj www.shabdraj.com