12/04/26
Breaking News

गणेश माळवे यांची पर्यवेक्षकपदी नियुक्ती

सेलु,दि 11 ः
येथील नूतन विद्यालयात पदोन्नतीने उपक्रमशील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक गणेश शेषराव माळवे यांची गुरुवार ( दि. १० ) रोजी पर्यवेक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नूतन विद्यालयात क्रीडा शिक्षक पदावर ३० वर्षे प्रदिर्घ सेवेत अनेक राष्ट्रीय व राज्य खेळाडूंना मार्गदर्शन करत‌, सेलू तालुक्यात अनेक राज्य क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. विविध क्रीडा सुविधा निर्माण केल्या आहेत.खेलो इंडिया बीच गेम्स दिव दमण,व नॅशनल गेम्स डेहराडून येथे सहभागी झाले आहेत.
या नियुक्ती बद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे,सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोरजी बाहेती, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड, सेवा निवृत्त पर्यवेक्षक देविदास सोन्नेकर यांनी अभिनंदन केले आहे.

Check Also

संत साईबाबांचे गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या जीवनावरील ग्रंथाचे प्रकाशन

सेलू दि ११(प्रतिनिधी) शिर्डीच्या साईबाबांचे गुरू तथा शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या चरित्राचे …