मोरया दीपावली फेस्टिवलचे मोठ्या उत्साहात उदघाटन

नगरसेविका सौ. करुणा शेखर चिंचवडे व शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचा उपक्रम

0 50

खडकवासला, प्रतिनिधी – कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेविका सौ. करुणा शेखर चिंचवडे आणि शेखर बबनराव चिंचवडे यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या मोरया दीपावली फेस्टिवल २०२१ चे उद्घाटन दिमाखात पार पडले, या सोहळ्याला सौ. उषा उर्फ माई ढोरे, महापौर पिं.चिं.मनपा, कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर शेठ जगताप, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सुरेश तात्या भोईर सभापती – ब प्रभाग कार्यालय, सागर अंगोळकर सभापती ड प्रभाग कार्यालय, सचिन चिंचवडे नगरसेवक पिं चिं मनपा यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते पार पडले,नगरसेविका सौ. करुणा ताई यांच्या समवेत कायम असणाऱ्या महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला.यावेळी प्रभागातील जेष्ठ मार्गदर्शक तात्या आहेर, आबा पडवळ, कामगार नेते अंबर चिंचवडे ,सुधीर आबा वाल्हेकर, भाजपा पदाधिकारी सौ.पल्लवीताई वाल्हेकर तसेच भाजपा पदधिकारी, मित्र परिवार व मान्यवर उपस्थित होते.

बचतगट उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन,दिवाळी फराळ,रंगबेरंगी आकाशकंदील ,मनमोहक पणत्या आणि सजावट,बाळगोपाळांसाठी फनफेयर,खाऊगल्ली याचा समावेश असलेल्या फेस्टिवल मध्ये नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभतोय. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार राजेंद्र चिंचवडे यांनी मानले.

error: Content is protected !!