12/04/26
Breaking News

सेलू येथे डॉ. सी. व्ही. रमण ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षेची प्रॅक्टिकल परीक्षा उत्साहात संपन्न

सेलू दि १२
कल्याणम् एज्युकेशन सोसायटी, परभणी यांच्या वतीने आयोजित डॉ. सी. व्ही. रमण ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षा (शैक्षणिक वर्ष 2025–26) अंतर्गत सेकंड लेव्हल प्रॅक्टिकल परीक्षा आज दिनांक १२ एप्रिल २०२६ (रविवार) रोजी श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय, सेलू येथील सायन्स लायब्ररीमध्ये उत्साहात संपन्न झाली.

या परीक्षेस प्रथम स्तरावर पात्र ठरलेल्या १०३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोग सादर करत आपली वैज्ञानिक दृष्टी आणि कौशल्य दाखवून दिले.

यावेळी बोलताना संस्थेच्या सचिव सौ. प्रियांका निशिकांत पाटील यांनी सांगितले की, डॉ. सी. व्ही. रमण ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षा ही विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी वाढावी आणि केवळ सैद्धांतिक शिक्षणावर भर न देता थिअरॉटिकल, प्रॅक्टिकल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह या तिन्ही अंगांचा विकास व्हावा, हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे.

तसेच, या परीक्षेतून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुढील टप्प्यात रिसर्च प्रोजेक्ट व मुलाखत (इंटरव्यू) घेण्यात येणार असून, त्यानंतर त्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Check Also

राणीसावरगाव येथील केदारेश्वर महादेव मंदिराचा दुर्मिळ दानशिलालेख

गंगाखेड प्रतिनिधी : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या मौजे राणीसावरगाव …