12/04/26
Breaking News

पूर्णेत जलकुंभ बांधकामाला अनाधिकृत विजपुरवठा,प्रशासनाचे अभय

पुर्णा,दि 10 (प्रतिनिधी) पूर्णा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या शहरात चार ठिकाणी टाक्यांचे बांधकाम सुरू आहे संबंधित गुत्तेदाराने अनधिकृत विद्युत पुरवठा घेत वीजचोरी केली सदरील गुत्तेदारास चार महिन्यापूर्वी दंड ठोठावण्यात आला परंतु अधिकृत मीटर न घेता पुन्हा वीजचोरी करताना दिसून आल्याने संबंधित गुत्तेदारास पुन्हा दंड आकारण्यात आला परंतु संबंधित गुत्तेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने सदरील गुत्तेदारावर राजकीय वरदहस्त असल्याने अधिकारी मूग गिळून गप्प बसले की काय अशी चर्चा सुरू आहे तर या गुत्तेदाराकडून शहरात चार ठिकाणी टाक्यांचे बांधकाम सुरू आहे कार्यवाही मात्र एका ठिकाणी झाल्याने महावितरणला लाखो रुपयांचा झटका धीरेसे देणाऱ्या या गुत्तेदारास सूट कोणाच्या आशीर्वादाने,
पूर्णा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी विविध ठिकाणी चार टाक्यांचे बांधकाम सुरू आहे यातील एका टाकीचे बांधकाम न प च्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात सुरू आहे संबंधित गुत्तेदाराने अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिल्याने संबंधित गुत्तेदाराने दबावतंत्र वापरून अत्यल्प दंड आकारण्यास भाग पडले खरे परंतु संबंधित वीजचोर गुत्तेदार पुन्हा वीजचोरी करत असल्याचे समोर आल्याने त्या गुत्तेदारावर दंड आकारात गुन्हा दाखल करणे आवश्यक असताना सुद्धा महावितरणचे अधिकारी गप्प आहेत
शहर अभियंता तर फोन सुद्धा उचलण्यास तयार नाहीत त्यामुळे सदरील गुत्तेदारावर महावितरण मेहेरबान आहे की सदरील गुत्तेदारावर राजकीय वरदहस्त असल्याने गुन्हा दाखल होत नाही गेल्या चार पाच दिवसांपासून सदरील बांधकामाच्या ठिकाणी पाणी नसल्याने बांधकामाला तडे गेल्याचे बोलले जात आहे स्थानिक नगरपालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांचे गुतेदारावर मेहेरबान तर नाही ना याकडे मतदार संघाचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी लक्ष घालून पूर्णेकरांसह महावितरणची आर्थिक लूट थांबवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Check Also

संत साईबाबांचे गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या जीवनावरील ग्रंथाचे प्रकाशन

सेलू दि ११(प्रतिनिधी) शिर्डीच्या साईबाबांचे गुरू तथा शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या चरित्राचे …