15/03/26
Breaking News

महिला दिनानिमित्त नगरपरिषद च्या वतीने महिला मेळावा संपन्न

बचत गटास सन्मानचिन्ह देऊन गौरव
पुर्णा / सुशील दळवी –
पुर्णा नगर परिषद, पूर्णा दीनदयाळ जनअजिविका अभियान (DJAY) स्‍वाभिमान शहर स्‍तर संघ संचलित सोनचिरैया शहर उपजिवीका केंद्र, पुर्णा यांच्‍या वतीने मुख्‍याधिकारी यांच्‍या मार्गदर्शनानुसार महिला मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले. तसेच याचे मेळाव्‍याच्‍या सुरुवातीस स्‍वाभिमान शहर स्‍तर संघ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्‍न झाली. महिला मेळाव्‍याच्‍या कार्यक्रमात सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्‍या स्‍मृती दिनानिमित्‍त त्‍यांना अभिवादन करण्‍यात आले. व रेणूकादेवी महिला बचत गटाच्‍या सदस्‍या मुक्‍ताबाई पंडित यांनी स्‍वागत गीत सादर केले. पुर्णा शहराच्‍या नगराध्‍यक्षा विमलताई लक्ष्‍मणराव कदम यांच्‍या हास्‍ते महिला मेळाव्‍याची उदघाटन करण्‍यात तर महिला व बालकल्‍याण समिती सभापती पदमीणबाई नामदेव एंगडे या अध्‍यक्ष म्‍हणून होत्‍या. तर प्रमुख अतिथी म्‍हणून सन्‍मानिय सदस्‍य न.प.पुर्णा प्रेमला भगवान सोळंके, लक्ष्‍मीबाई विष्‍णुकांत भालेराव, जनाबाई ज्ञानोबा जोंधळे, पुजा सचिन कदम, श्रीमती वंदना सत्‍यभान कुलदिपके, कौशल्‍या मारोती भोसले तसेच स्‍वाभिमान शहर स्‍तर संघाच्‍या अध्‍यक्षा द्रोपदी सोनुले व सचिव गोदावरी नाराणकर कार्यक्रमास उपस्थित होते.

 

सन्‍मानिय नगर सेविका प्रेमला भगवान सोळंके यांनी त्‍यांच्‍या मनोगतातुन महिलांना आधार सन्‍मान समृध्‍दीचा जागर स्‍त्री शक्‍तीचा या ब्रिद वाक्‍य नसुन तो आपल्‍या कष्‍टाचा गैरव आहे असे त्‍या बोलुल महिलांची मन जिंकली. महिला दक्षता समितीच्‍या समुपदेशक प्रियंका गिरीश एंगडे यांनी महिलांना कायदेविषयक कायदयाची सविस्‍तर महिती दिली. तसेच सयद अतिख यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना महिला दिनाचा कार्यक्रम महिलांनी न घेता हा कार्यक्रम खर तर पुरुषांनी घेतला पाहिजे. त्‍यांनी सुभेच्‍छा दिल्‍या पाहिजे महिला तर महिलांचा सन्‍मान करतात पण पुरुषांनी केला पाहिजे. बचत गटातील राजरत्‍न, राजनंदीणी, गायत्री, रेणूकादेवी या गटातील महिलांना त्‍यांचा अनुभव सांगितला व व्‍यवसाय कसा वाढवावा त्‍याला बाजारपेठ मिळवुन देण्‍या संदर्भात नगराध्‍यक्षा यांनी विनंती करण्‍यात आली.

 

शहरातील महिला बचत गटांना व्‍यवसायात उल्‍लेखनीय कार्य करणा-या बचत गटाचे सन्‍मान चिन्‍ह देवुन गौरव करण्‍यात आला. त्‍यामध्‍ये गायत्री महिला बचत गट, राजनंदीनी, महेक, राजरत्‍न, रोहिदास, वाघेश्‍वर, रेणुकादेवी, उर्विला, दुर्गामाता, आधार इ.महिला बचत गटाचा समावेश होता. त्‍याचप्रमाणे कृषि विज्ञान केंद्र परभणी यांच्‍या मार्फत ज्‍या महिला बचत गटाच्‍या सदस्‍यांनी प्रशिक्षण पूर्ण केले त्‍यांना प्रमाणपत्र वाटप करण्‍यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समुदाय संघटक पुष्‍पा बनसोडे यांनी केले. आभार प्रदर्शन शहर उपजिविका केंद्र चे व्‍यवस्‍थापक राहुल जोंधळे यांनी केले. कार्यक्रम पूर्ण यशस्‍वी करण्‍यासाठी शहर उपजिवीका केंद्र चे लेखापाल राजु आहिरे समुह संसाधन व्‍यक्‍ती (CRP) वैशाली एंगडे, पुष्‍पा चुनोडे, मधुमाला राऊत, आम्रपाली रणवीर, आश्विनी बागल यांनी परिश्रम घेतले.

Check Also

अवैध वाळू प्रकरणी बातम्या लिहिल्याचा राग; पत्रकाराला धमकी दिल्याचा आरोप, तलाठ्यावर कारवाईची मागणी !

पाथरी प्रतिनिधी तालुक्यातील डाकूपिंपरी परिसरातील अवैध वाळू उत्खननाबाबत वारंवार बातम्या प्रकाशित केल्याचा राग मनात धरून …