परभणी,दि 22
परभणी येथील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने रुग्णसेवेच्या उद्देशाने आणि रुग्णांच्या गैरसोयी टाळण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. परभणी बस स्थानक ते आर.पी. हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी या मार्गावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाला उपलब्ध असेल. अशी माहिती आमदार डॉ राहुल पाटील यांनी दिली.
या सेवेमुळे विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी प्रवास सुलभ होणार आहे.
या सेवेचा उद्देश रुग्णांना वेळेवर हॉस्पिटलपर्यंत मोफत पोहोचण्यास मदत करणे हा आहे.मोफत वैद्यकीय तपासणी आणि गरीब गरजू रुग्णांना मोफत सर्व सामान्य रुग्णांना परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये औषधे, रक्त तपासणी, MRI, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि एक्स-रे यांचा समावेश आहे. या सुविधांमुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणे शक्य होईल.
आर.पी. हॉस्पिटलचे प्रमुख आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी या उपक्रमाबद्दल सांगितले, “रुग्णांना वेळेवर आणि मोफत वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मोफत बस सेवेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचणे सोयीचे होईल आणि त्यांचा उपचाराचा प्रवास सुखकर होईल. तसेच, मोफत तपासणी आणि परवडणाऱ्या दरातील वैद्यकीय सुविधांमुळे प्रत्येक रुग्णाला दर्जेदार उपचार मिळतील.”
हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “या मोफत बस सेवेचा आणि वैद्यकीय सुविधांचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान डॉ. शिंदे यांनी केले