01/07/25
Breaking News

टाकळी कुं. येथील मुख्य रस्त्याच्या कामाचे आनंद भरोसे यांच्या हस्ते उद्घाटन

परभणी (प्रतिनिधी): ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून ग्रामविकासाअंतर्गत अल्पसंख्याक निधी मूलभूत सुविधेसाठी परभणी विधानसभेतील मौजे टाकळी (कुं.) येथे मुख्य रस्त्याच्या कामासाठी २५ लक्ष निधी उपलब्ध करून त्याचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या हस्ते करण्यात आले.
टाकळी (कुं.) येथील नागरिक मागील अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित होते. परंतु नागरीकांच्या मागणीनुसार येथील अनेक कामे आनंद भरोसे यांनी मार्गी लावली आहेत.
याप्रसंगी आनंद भरोसे म्हणाले की, ग्रामीण भागाच्या वाढत्या नागरीकरणाचा विचार करुनच नियोजनबद्ध विकास करण्याचा प्रयत्न सातत्त्याने मी करत आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह, अंतर्गत रस्ते, पाणी, आरोग्य, पथदिवे, बंदिस्त गटार अशा मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत ती कामे पूर्ण करण्यावर भर देखील दिला आहे. या विकास कामांसाठी मागील अनेक वर्षापासुन जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. केवळ आश्वासने न देता सर्वसमावेशक व शाश्वत विकास करण्यावर सदैव भर दिला आहे. नागरीकांच्या मुलभूत सेवा सुविधांसाठी मी सदैव आपल्या सोबत भूमिपुत्र या नात्याने प्रत्येक सूख दुखात आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधीक्यांने निवडून द्यावे असे संबोधीत केले व तसेच यापुढेही अशीच विकासात्मक कामे करेल, असे आनंद भरोसे यांनी आश्वासित केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रभाकरराव कदम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रल्हादराव होगे पाटील, प्रकाशराव सामाले, सुंदरराव देशमुख, रोहन सामाले, तुकाराम घोलप, शंकर राऊत, अशोक कदम, संतोष सामाले, कान्हा पुके, आदि गावातील जेष्ठ नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पंकज क्षीरसागर यांना शासनाचा राज्यस्तरीय ‘पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार’

परभणी,दि 27 ः जिल्ह्यातील प्रसारमाध्यम क्षेत्रात सातत्याने दर्जेदार आणि सामाजिक भान असलेले पत्रकारितेचे योगदान देणारे …